STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

4  

Surekha Nandardhane

Others

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

1 min
334

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा


खरंच लहानपण किती छान असते कशाचेच टेन्शन नाही शाळा आणि घर हीच आपली दुनिया.

  तसं बघितलं तर बालपण विसरत नाही ते आता हरवले आहे उरल्या त्या फक्त आठवणी .

 आपण जी मजा केली ती आताची मुले करत नाही.बरेचश्या मुलांना खेळाचे नाव सुद्धा माहीत नसते

आता मोबाईल आणि व्हिडीओ गेम याच्यातच बालपण अडकलेले आहे .

 पावसाळ्यात मुद्दाम भिजायचे खड्यातील साचलेले पाणी पायाने उडवायचे एकमेकांना मुद्दाम पाण्यात ढकलायचे

चिखलांनी कपडे भरून घरी जायचे मग आईचे बोलणे खायचे

   उन्हाळ्यात आंबे कैऱ्या घरी खायला मिळत पण त्यापेक्षा मित्र मैत्रीण सोबत दुसऱ्याच्या झाडावरचे आंबे चोरून खायला जास्त मजा यायची . कोणी दगड मारणार तर कोणी गोळा करणार तर कोणी मालक येईल म्हणून लक्ष ठेवणार .

 शाळेच्या सुट्टीत डब्बा खाण्यापेक्षा वर्गात अभ्यासाच्या तासाला लपून डब्बा खायची मज्जा च काही वेगळी

आजही हे सर्व आठवले की स्वतःलाच स्वतःचे हसू येते.

   पण आता सर्व काही बदलले.

लहानपणी पैसा नव्हता पण वेळ सर्वांकडे होता . एकमेका विषयी ओढ होती प्रेम होते

आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण निसटून गेले आणि

जबाबदारीच्या जाळ्यात अडकुन बसले.

उरल्या त्या फक्त आठवणी

म्हणून कधी वाटते पुन्हा लहान व्हावे व नव्याने पुन्हा आयुष्य जगावे …



Rate this content
Log in