Jyoti gosavi

Children Stories Fantasy

4  

Jyoti gosavi

Children Stories Fantasy

हरी पॉटर फास्टर फेणे अॅन्ड ऍलिस इन वंडरलैंड

हरी पॉटर फास्टर फेणे अॅन्ड ऍलिस इन वंडरलैंड

4 mins
333


एकदा काय झाले हरी पॉटर च्या छडीची काहीतरी जादू चुकली आणि तो वंडरलैंड मध्ये येऊन पडला. 

त्याच वेळी फास्टर फेणे आपल्या सायकल वरून सुसाट जात असताना तो देखील सशाच्या बिळात अलगत सायकल सहित पडला. मुळातच या घरांमध्ये अॕलीस अडकलेली होती, आता तिच्या बरोबर अजून हे दोघे येऊन पडले. आधीच ते छोटेसे घर त्यात आता तिघांची दाटीवाटी झाली. त्यामुळे अॕलीस अधिकच रडू लागली. 

रडू नको! रडू नको! तू कोण? फाफे ने तिला विचारले. 

 मला अॕलीस म्हणतात, मी सशाच्या मागे धावताना या बिळात पडले .पण मला आता यातून बाहेर पडता येत नाही. आता मी काय करू? असे म्हणून अॕलीस पुन्हा रडू लागली. 

 त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते . हरी पॉटर ने आपल्या जादूच्या छडीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. कसाबसा एक दरवाजा उघडला. बाहेर एक सुंदर बाग होती. रंगीबेरंगी कधी न पाहिलेली झाडे होती. फुले होती. 

सर्वांना बाग खूप आवडली. आता आपण काय करू या? या बागेत जाऊया?

 अरे! पण हे दरवाजे खूपच छोटे आहेत. आपण खूप मोठे आहोत, आपण इथे अडकून पडलो, आता कसं बाहेर जायचं. फास्टर फेणे ने आपल्या सायकलवर बसून त्या घराला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु घर काही हल्ले नाही. आता काय करायचे? तेवढ्यात एका काचेच्या टेबलवर तिघांना एक बाटली दिसली. 

त्या बाटलीवर असे लिहिले होते मी तुमची मदत करू शकते? त्यांना काही समजेना परंतु त्यांनी ते बॉटल खाली घेऊन त्यातील एक एक घोट पिला त्याबरोबर ते खूप छोटे झाले. त्यातला एक थेंब सायकल वरती पडला त्यामुळे फास्टर फेणे ची सायकल देखील छोटी झाली . पण ते इतके छोटे झाले की, मघाशी अॕलीस रडली होती, तिच्या डोळ्यांच्या अश्रूच्या तलावांमध्ये तिघे बुडू लागले. फास्टर फेणे ला पोहोता येत होते .तो कसाबसा आपली सायकल घेऊन पोहत पोहत दरवाज्यापाशी उभा राहिला. प्रथम त्याने आपली सायकल एकाबाजूला सुरक्षित ठेवली, नंतर पुन्हा जाऊन हरी पॉटरला आणि अॕलीसना त्या अश्रूंच्या तलावातून ओढत ओढत बाहेर आणले .अरे आपण समुद्रात पडलो नव्हतो ना एलिस विचारले .नाही आपण इतके छोटे झालो आहोत की तू मगाशी रडली होतीस त्या अश्रुंच्या तळ्यात आपण पडलो होतो आणि बुडत होतो. हॅरी पॉटर म्हणाला. 

फास्टर फेणेने आपल्या सायकलवर पुढे एलिसला बसवले पाठीमागे कॅरेज वर हरी पॉटर ला बसवले आणि तिघेजण अलगद दरवाजातून बाहेर पडले. 

त्यांनी बागेत एक छान फेरफटका मारला. तिघांना पण ही दुनिया नवीन होती वेगळी होती. यामधील प्राणी अतिशय छोटे छोटे होते कधी न पाहिलेल्या, गोष्टी तेथे दिसत होत्या. लाल रंगाची ,निळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची झाडे होती आणि त्या सर्वांना फुले मात्र पांढरी होती. हॕरीने आपल्या जादूने सगळ्या झाडांना पांढरा रंग दिला आणि सगळी फुले रंगीबेरंगी केली. अशा सगळ्या गोष्टी बघत बघत फाफे च्या सायकल वरती दोन चार राऊंड मारले. त्यानंतर मात्र त्यांना याचा कंटाळा आला त्यांना स्वतःचे मूळ रूप पाहिजे होते. त्यासाठी तिघे पण इकडेतिकडे बघू लागले अरे देवा मी आता घरी कशी जाणार? मला माझे मूळ रूप कोण परत देईल? असे म्हणून अॕलीस रडू लागली. तिच्या रडण्याने त्या झाडावरची एक हिरवी अळी तिला म्हणाली. 

या मशरूमची एक बाजू खाल्ली तर छोटे होता येते. दुसरी साईड खाल्ले तर मोठे होता येते. आणि ती पळून जाऊ लागली. हॕरीने आपल्या जादूच्या छडीने स्तंभन केले .तिला थोडे मोठे रूप दिले ,आळीला पंख दिले आणि तिघे जण तिच्या वरती बसून त्या बागेमध्ये फेरफटका मारून विमानात बसल्याचा आनंद घेऊ लागले. आळी आता दमली होती तिने त्यांना सोडण्याची विनंती केली. हॕरी तिला म्हणाला तू आम्हाला मोठे होण्यासाठी उपाय सांग तर आम्ही तुला सोडून देऊ . काय केल्यामुळे आम्ही आमच्या मूळ रूपात परत येऊ शकतो .आळी म्हणाली मी तुम्हाला सांगते पण मला माझे मूळ रूप नको मला आता हे पंख आवडतात. मला पण तुमच्याबरोबर वंडरलँड च्या बाहेर घेऊन चला. मग त्याने तिला होकार दिला. आळी त्यांना आपल्याबरोबर ते एका छोट्या बिळामध्ये घेऊन गेली .तेथे निळ्या रंगाचा चौकोणी तुकडा होता. त्याचे लाल मुंग्या रक्षण करत होत्या. 

जर हा तुकडा तुम्ही खाल्लात तर तुम्ही पुन्हा मोठे होऊ शकता. एक तर ह्या तिघांचे आकार छोटे छोटे होते त्यामुळे लाल मुंग्या यांच्यावर हल्ला करू लागल्या. यांना चावू लागल्या . तिघे पण जोरात ओरडून नाचू लागले त्यानंतर हॕरीला एक युक्ती सुचली आणि त्याने जोरात ओरडून आपले छडी ऊभी केली आणि स्तंभन मंत्र म्हटला. त्याबरोबर सर्व मुंग्या जागच्या जागी स्थिर झाल्या .त्याने हळूच तो तुकडा बाहेर काढला. आणि तिघांनी थोडा थोडा खाल्ला त्याबरोबर ते आपल्या मूळ रूपात आले. पण आता यातून बाहेर कसं जायचं? बाहेरचा रस्ता कोणाला माहित नव्हता. हॕरी म्हणाला" मला जादू करता येते "तुम्ही सर्वजण या जादुच्या छडी वर बसा. मग मी मंत्र म्हणतो आपण बाहेर जाऊया. 

यानुसार अॕलीस , फास्टर फेणे ,छोटूशी आळी, आणि हरी पॉटर स्वतः छडी वर बसले. त्यांनी छडीला आदेश दिला "पूर्व देश प्राप्‍तम् " त्याबरोबर त्या छडीने तिघांना पण आपापल्या देशांमध्ये सोडले. पुन्हा एकदा भेटण्याचे वचन घेऊन, सर्वजण आपापल्या जागी आले.ते आळी रुपी फुलपाखरू फास्टर फेणे सोबत पुण्यात आले इतर फुलपाखरांना पेक्षा आकाराने बरेच मोठे असणारे हे फुलपाखरू कायम फास्टर फेणे च्या डाव्या खांद्यावर बसत असे आणि त्याच्याबरोबर जगाची सैर करत असे त्यानंतर त्याला फास्टर फेणे फुलपाखरू वुइथ नाव पडले.


Rate this content
Log in