kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

ही कुणी छेडिली तार…….

ही कुणी छेडिली तार…….

7 mins
311


सहा फूट उंचीचा अभिजित देशमाने कसलेला फुटबॉल खेळाडू होता. आठवीमध्ये असल्यापासूनच त्याची उंची जबरदस्त वाढायला लागले. सतत होत असलेला व्यायाम आणि मैदानी खेळ याच्यामुळे अभिजीत ची वाढ एकदम निकोप होत होती.

 सावळा वर्ण, मजबूत हात आणि पाय, किंचीत कुरळे केस, सरळ नाक, आणि काळेभोर बोलके डोळे. फुटबॉलचा कॅप्टन असलेला अभिजीत सेंटर फॉरवर्ड ला उभा राहिला की प्रतिस्पर्धी टीमची गाळण उडायची. त्याचे सुरेख पास, धावण्याची जबरदस्त स्पीड, स्वतःच्या शरीरावरचा कंट्रोल,, लवचिकपणा आणि कशाही कोलांट्या उड्या मारायची तयारी, यामुळे कॅप्टन अभिजीतचा फुटबॉल च्या खेळाडूंवर एक वेगळाच धाक होता.


      कुलकर्णी राधिका , अतिशय उत्तमबास्केटबॉल खेळाडू. गोरापान रंग, आणि पोनीटेल मध्ये बांधलेले पिंगट केस, मोठ्या मोठ्या पापण्यांनी आच्छादलेले निळसर घारे डोळे,  सरळ करारी नासिकI,, अतिशय उत्तम रित्या बास्केटबॉल च्या मैदानावर लीलया खेळायची. त्यांच्या टीमचे कॅप्टन जरी नसली तरी तिच्या हातात बॉलआल्यावर, ती कुठून , कशी बास्केट करेल याची शाश्वती नसायची.


    शाळेची फुटबॉल आणि बास्केटबॉल टीम नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचली. ओरिसाच्या भुवनेश्वरमध्ये फायनल मॅचेस खेळवल्या जाणार होत्या त्यासाठी दोन्ही खेळांचे खेळाडू आणि काही अतिरिक्त खेळाडू हे मुजुमदार मॅडम आणि राजीव सर यांच्याबरोबर भुवनेश्वरला रवाना झाले.

     मुंबई भुवनेश्वर, दुरचा टप्पा. सगळेच खेळाडू असल्यामुळे त्यांना कुठल्याही कष्टाची काही तक्रार नसायची उलट अभ्यासापासून सुटका झाल्यामुळे सगळे खेळाडू फारच मजेत होते.

 राधिकाचा ट्रेन मधला बर्थ नेमका वरच्या मजल्यावर चा आला, चढायचा प्रॉब्लेम झाला तर अभिजीत ने मोठ्या मनाने तिला मदत केली आणि आपलI बर्थ तिला दिला.

   झालं तेव्हापासून दोघांची घनिष्ट मैत्री सुरु झाली. खाण्याचे सामान, एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टी, एकमेकांशी शेअर करत, वाटून घेत प्रवास केव्हा संपला कळलं देखील नाही.

     अभिजीत जरी रांगडा खेळाडू होता तरी तो उत्तम बासरी वाजवायचा, त्यामुळे त्याच्या बासरी वादनाने तर प्रवासाची मजा अजूनच वाढली.

 एक तर मुलांची ट्रीप म्हणजे फारच मजा असते, गाणी, गप्पा,, भेंडी,,, बरेच खेळ, मध्ये मध्ये डेअर डेव्हिल पण.


       भुवनेश्वरला पोहोचल्यानंतर मुला मुलींचे हॉस्टेल वेगवेगळे असले तरी सरावाच्या वेळेस त्यांची भेट होत होती. राधिका आणि अभिजीत ची मैत्री बहुतेक सगळ्यांना माहीत झाली होती. तसे मित्र-मैत्रिणी सगळेजण होते पण राधिका ची मैत्री जरा वेगळी आणि स्पेशल वाटत होती.

अभिजीत जेव्हा-केव्हा राधिकाच्या वर्गा वरून जायचा तेव्हा राधिकाचे मित्र-मैत्रिणी जोरात ओरडून तिचं लक्ष दरवाज्याकडे करून द्यायचे.

 राधिकेच्या मनात असो व नसो, पण पण बाकी मुलांना त्यांच्या मैत्रीमध्ये फारच इंटरेस्ट होता.


 शिक्षक देखील सगळ्यांमध्ये सामील व्हायचे.

 जेव्हा जेव्हा फुटबॉलची मॅच असायची तेव्हा मुद्दामून राधिकेच्या वर्गाला पटांगणावर सोडण्यात यायचे.


 बास्केटबॉल च्या मॅच च्या वेळेला देखील मुद्दामच वर्गांना मैदानावरची सोडण्यात यायचे.

 मुजुमदार मॅडमच्या लक्षा मध्ये जेव्हा हा प्रकार आला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सगळ्यांची कान उघडणी केली.


          बोलता-बोलता वर्ष निघून गेलं आता राधिका नववीमध्ये आणि अभिजीत दहावी मध्ये आले.

 मुला-मुलींच्या मनामध्ये जरी काही नसलं तरी त्यांच्या वर्तणुकी वरून आजूबाजूचे लोक काही अंदाज बांधत असतात. आणि जेव्हा मुला-मुलींची एकत्र अशी शाळा असते तेव्हा बऱ्याच जोड्या जमत असतात. काही टिकतात आणि बऱ्याच मोडतात. जोड्या तयार करण्यामध्ये, आणि आणि त्या मोडण्या मध्ये मित्रमंडळींचा बरा सहभाग असतो.


 सतत एखाद्या मुलाला किंवा मुलीला मुलावरून चिडवले तिच्या पण मनामध्ये काहीतरी भावना निर्माण होते. नुसतं बोललं किंवा बघितलं, तर तरीपण बाकीची मित्रमंडळी सुतावरून स्वर्ग गाठतात.


 शाळेतले शिक्षक देखील याला काही अपवाद नसतात. मात्र मुजुमदार मॅडमच्या निगराणीखाली असल्यामुळे शिक्षक वर्ग देखील, आपल्या जीभा ताब्यात ठेवत असे.


 अभिजीत राधिकाची मैत्री हा काही शिक्षकांचा एक चघळण्याचा विषय झाला होता . घरी-दारी तोच विषय.

  शाळेतल्या मुलांचे वय म्हणजे पौगंडावस्था नाही का? भविष्याचा विचार, किंवा अजून काही, याचा या अवस्थेमध्ये विचारच केला जात नाही. मग अशा मुलांना शिक्षकांनी सांभाळायचं नाहीतर कोणी? दिवसातले सात ते आठ तास मुले शाळेत असतात.

   मुजुमदार मॅडम सर्व शिक्षकांची मीटिंग घेऊन त्यांना स्पष्ट शब्दांमध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

त्यानंतर मात्र सर्व शिक्षक पण जागृत झाले आणि त्यांच्या गप्पा थांबल्या.मुलांना मुली विषयी, आणि मुलींना मुलांविषयी आकर्षण वाटणी ही नैसर्गिक क्रिया आहे, त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सांभाळले तर सगळ्यांचे आयुष्य सुदृढ आणि सशक्त होऊ शकते.

 मुला-मुलींच्या शाळेमध्ये मुला मुलींनी जर राधाकृष्ण सारखे राहिले तर कोणालाच काही वाटण्याचे कारण नाही.


 राधिका हुशार विद्यार्थिनी त्यामुळे कायम अभ्यासाच्या बाबतीत कुठलीच तडजोड न करता ती सातत्य राखत असे.

 त्याच्या उलट अभिजीत जरी जात्याच हुशार होता तरीही अभ्यास न करण्यामुळे ातरी 70 /75 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचायचा.

 राधिका 90 ते 95 टक्‍क्‍यापर्यंत कायम स्वतःला ठेवायची.

         दहावीच्या पहिल्या सत्रामध्ये परत नॅशनल आल्यामुळे अभिजीत ची बरीच शाळा , क्लास.बुडाले,

 त्यामुळे अभ्यासामध्ये तो फारच मागे पडला. पहिल्या सत्राच्या परीक्षेमध्ये त्याला फक्त पन्नास टक्के मार्क मिळाले.

 पण त्याचे राधिकाला भेटणे तर जवळजवळ रोजच चालू असे.मधल्या सुट्टी मध्ये किंवा इतर फ्री पीरियड्स मध्ये पीटीच्या तासाला लायब्ररीच्या तासाला किंवा लॅबोरेटरी मध्ये जाताना अभिजितचे राधिका ला भेटणे निश्चितच असायचे. भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांनी एकमेकांना दिलेल्या हायफाय! बरच बोलकं असायचं. त्यांची घरी जाण्याची बस जरी वेगवेगळी असली तरी दोघे बस सुटेपर्यंत काहीतरी गप्पा मारत असत. नाहीतर मैदानावर ती प्रॅक्टिस करत असत.

 दोघेजण बऱ्याच वेळेला तलाव पाळी वरती देखील लोकांना दिसली होती.


 मुजुमदार मॅडमने एक दिवशी अभिजीतच्या पालकांना आणि राधिकेच्या पालकांना वेगवेगळे बोलावून त्यांच्या मैत्रीची कल्पना दिली.

 मुलांची मैत्री, त्याला त्याला काय एवढे महत्व द्यायचे असे दोघांच्याही पालकांना वाटले. पण अभिजीत घसरलेली गुणवत्ता पाहून अभिजीत ची आई मात्र काळजी मध्ये वाटली.


 अभिजीतने वचन दिले की पुढच्या सत्रांमध्ये तो उत्तम गुणांनी पास होईल.


 शाळेच्या मुलांच्या बास्केटबॉल मध्ये आर्य मांडे म्हणून एक उत्तम खेळाडू होता. आर्य आणि त्यांची टीम मुलींना सराव देण्यासाठी त्यांच्या बरोबर खेळत असे.

 राधिका आणि आर्य यांची देखील फारच मैत्री झाली आणि त्याच्यामुळे अभिजीतला फारच त्रास व्हायला लागला.

 दुसऱ्या सत्रांमध्ये मध्ये अभिजीत कसातरी पास झाला.

राधिका आणि तिची टीम जेव्हा आर्य आणि त्याच्या टीम बरोबर सराव करायला लागली , विशेषतः अभिजीतचे मित्रमंडळ त्याला चिडवायला लागले

” बघ बघ, आर्य न तुझी राधिका पळवली.”


 शेवटी मुजुमदार मॅडमनी अभिजीतला ,''गुण का बर कमी होत चाललेत"" याच्याबद्दल चौकशी करत आपल्या ऑफिसमध्ये बोलवले.

 विद्यार्थ्यांनी बसायचे नाही असा दंडक असताना देखील मॅडमनी अभिजीतला आपल्या जवळ बसवले.

 अभिजीतला राधिका अतिशय आवडत असल्यामुळे आणि सध्या आर्य बरोबर जास्त खेळत असल्यामुळे त्याचं चित्त जरा विचलित झालेलं होत.


 बराच प्रयत्न केल्यानंतर मुजुमदार मॅडमने, अभिजीत अभिजीतच्या मनात काय चालले आहे ते काढून घेऊ शकल्या.

त्यात भर म्हणून की काय पण अभिजीत अभिजीत से मित्र

 पण त्याला वेळोवेळी चिडवत, त्यामुळे त्याचे अभ्यासाकडे फारच दुर्लक्ष व्हायला लागले.


 मुजुमदार मॅडमनी त्याला नीट समजावले,” बेटा, प्रत्येक प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतंत्र असत, हे आपल्याला आयुष्य घडवायचे आहे का बीघडवायचे आहे.

 कोणी काही म्हटलं किंवा चिडवलं तरी तु लक्श देऊ नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे आणि तुला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे त्याच्याकडे लक्ष दे.

 एक लक्षात ठेव, हत्ती जेव्हा चालतो ना तेव्हा आजूबाजूची कुत्री खूप जोरात ओरडतात भुंकतात, पण म्हणून काही हत्ती  थांबत नाही, नाही, किंवा आपली चाल  बदलत नाही. एवढा फुटबॉलचा कॅप्टन आणि लहान लहान गोष्टींवरून स्वतःचं चित्त विचलित करू नकोस.”


 खूप समजावल्यानंतर अभिजीत शांत झाला.

 



मनातून जरी हसू येत असलं तरी मुजुमदार मॅडमनी अभिजितला मदत करायचे ठरवले. त्यांनी अभिजीतला समजावून सांगितलं, की राधिका कुठे पळून जात नाही, मात्र जर अभिजीत कमी गुणांनी पास झाला तर त्याचं भविष्य मात्र अंधारमय होईल. 50% पास झालेल्या मुलांना कुठलं चांगलं कॉलेज एडमिशन देईल? आणि अभिजीत ची प्रकृती, एकाग्रता एवढी चांगली होती त्याच्यामध्ये कुवत पण होती की तो अतिशय उत्तम गुणांनी पास होऊ शकेल मग त्यांनी काहीतरी वेडावाकडा विचार करत का बरं स्वतःची बरबादी करावी?


 अभिजीतला पटत नव्हतं, पण मुजुमदार मॅडम ना त्याने वचन दिले की आता परीक्षेमध्ये तो उत्तम गुणांनी पास होईल. रोजच्या सरावासाठी तो अर्धा तासच फुटबॉल खेळू लागला, आणि लायब्ररी किंवा शिक्षकांबरोबर बसून त्यांनी आपला अभ्यास नेटाने कम्प्लीट केला.

 राधिकेचे अभ्यास, खेळ व्यवस्थित चालू होतं. मजुमदार मॅडमनी तिला पण समजावून सांगितले, एखाद्या मुलाला इतकही गुंतवू नये की त्याचं भविष्य खराब होईल. राधिकेला आश्चर्य वाटलं, कारण आर्य बरोबर तिची फक्त मैत्री होती आणि अभिजीत साठी तिच्या मनामध्ये कोमल भावना होत्या. राधिकेने तसं मुजुमदार मॅडम ला सांगितलं पण.


    मुजुमदार मॅडमनी दोघांनाही अभिजीत ची परीक्षा होईपर्यंत दूर राहायला सांगितले.


   दोन महिन्यानंतर अभिजीतचा अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास झाला होता आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तो सज्ज झाला होता. अतिशय उत्तम रित्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून अभिजित मजुमदार मॅडमचे आभार मानण्यासाठी गेला.

    त्याच्याविषयी अतिशय प्रेम असल्यामुळे मुजुमदार मॅडमनी त्यांना विचारले भविष्याबद्दल अभिजीतच्या काय कल्पना आहेत.

 बाबा पायलेट असल्यामुळे अभिजीत ला पण पायलेट होण्याची किंवा सेवा दलात जाण्याची फार इच्छा होती.

 मुजुमदार मॅडमनी समजावून सांगितले की” आधी तू तुझ्या भविष्यावर ती नजर केंद्रित कर आणि त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न कर. तू जर उत्तम यश मिळवले तर तुझाच आत्मविश्वास खूप वाढेल.”. मुजुमदार मॅडम ,” बेटा तू जरूर पायलेट हो, मला तुझ्या विमानात बसून सफर करायला आवडेल. नेशील ना मला बरोबर?”

 

 अतिशय आत्मविश्वासाने मान हलवत अभिजीत म्हणाला,” जरूर मॅडम! माझं पण तेच स्वप्न आहे.”


त्यावर्षी अभिजीत अतिशय उत्तम गुणांनी दहावी पास झाला. त्यानंतर मात्र त्याची काहीच खबरबात आली नाही. राधिका अतिशय उत्तम रित्या दहावी आणि बारावी पास होऊन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी गेली.


 बघता बघता कितीतरी वर्ष सरले, मुजुमदार मॅडम आता सेवानिवृत्त झाल्या होत्या.




 सिंगापूरच्या फ्लाईट साठी मुजुमदार सर आणि मॅडम मुंबईच्या विमानतळा वर  वाट बघत होते.

 विमानात चढण्यासाठी जेव्हा ते रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांना ेट विमान कंपनीच्या कर्मचार्‍यांनी येऊन सांगितले की त्यांनी सगळ्यात शेवटी विमानात चढावे.

 मुजुमदार दांपत्य आता वृद्ध झाले होतं, आणि ते आपल्या मुलाकडे सिंगापूरला काही महिन्यांसाठी जात होते.

 दोघेही जण सगळ्यात शेवटी विमानामध्ये चढले.


     त्यांचे दोघांचेही तिकीट इकॉनॉमी होतं, पण विमानात केल्यानंतर त्यांना हवाईसुंदरीने अतिशय आदराने बिझनेस क्लास मध्ये बसवले, आणि मुजुमदार मॅडमच्या हातामध्ये एक पुष्पगुच्छ ठेवला.

 हवाई सुंदरी अतिशय अदबीने म्हणाली

,: फ्रॉम कॅप्टन अभिजीत देशमाने सर”


 त्यांना अतिशय आनंद झाला, एकमेकांकडे बघत त्यांनी खुशीने मान डोलावली. म्हणजे आपल्I अभिजीत पायलट झाला होता.


 पूर्ण विमान प्रवासात मॅडम आणि सरांची विशेष देखभाल करण्यात आली. दोघांनाही कृतकृत्य वाटले.


 सिंगापूरला पोहोचल्यानंतर, हवाई सुंदरीने सगळे प्रवासी उतरून जाऊ पर्यंत थांबण्याची विनंती केली.


 आणि विमानात समोरुन एक अतिशय देखणा रुबाबदार कॅप्टन अभिजीत देशमाने येऊन त्यांच्या पाया पडला.

 भरलेले डोळे घेऊन अभिजीत म्हणाला,” मॅडम केवळ तुमच्यामुळे मी आज माझे ध्येय गाठू शकलो”


 विमानात मागच्या बाजूने एक सुरेख देखणी स्त्री पुढे आली, तिच्या हाताशी गोड गोजिरी कुरळ्या केसांची अभिजीत सारखी दिसणारी मुलगी होती.

 मुजुमदार मॅडमने तिला ताबडतोब ओळखलं

,” राधिका तू????”


 अभिजीत आणि राधिकाला एकदमच मिठीत घेत मॅडम ना हुंदका फुटला.


 राधिका म्हणाली,” ठरलं होतं आमचं, की पहिले अभ्यास पूर्ण करायचा, आपले ध्येय मिळवायचं आणि मगच लग्न करायच.” “ मॅडम तुम्ही आम्हाला समजावलं, त्यामुळेच आमचे आयुष्य सावरल गेलं."


 राधिका आता डॉक्टर राधिका अभिजीत देशमाने आहे, आणि त्यांची गोडली नेहा अभिजीत देशमाने.


परिपक्व नसलेल्या वयामध्ये, प्रेम हे नक्की प्रेम असतं का? की कुठले आकर्षण असते. कुठल्यातरी कल्पनांमध्ये मुले रमून आपल्या जीवनाची नासाडी करून घेतात. त्यांना सांभाळणारे जेव्हा सशक्त असे हात असतात तेव्हा सगळ्यांची आयुष्य सावरली जातात. मुला-मुलींनी एकत्र शिकणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी जरी योग्य असलं तरी वाटा फार  घसरड्या असतात. या वाटांवरती समज आणि गैरसमज होणे अगदी सहज शक्य असते, कोवळ्या मुलांच्या मनावरती त्याचा फार खोल आणि गहिरा परिणाम होतो. त्याच्यामुळे तिथे त्यांना सांभाळण्यासाठी योग्य सशक्त हात असणे अतिशय आवश्यक असते.



Rate this content
Log in