Yogesh Khalkar

Others

2  

Yogesh Khalkar

Others

गर्दी

गर्दी

1 min
3.2K


मानवाला पूर्वीपासून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजात रहायला आवडते. यातूनच गाव आणि शहर यांची निर्मिती झाली. पण काळाच्या ओघात गावं आणि खेडी मागं पडली आणि शहरात उद्योग मोठया प्रमाणात असल्याने गावातले लोकं तिकडं जाऊ लागले यामुळेच शहरात रहाण्याची समस्या निर्माण झाली व त्यातून एक बिकट समस्या निर्माण झाली ती म्हणजे झोपडपट्टी. निवाऱ्याची गरज म्हणून झोपडया उभ्या राहिल्या आणि त्यांनी शहराचा चेहरा बदलला.


याच गर्दीत मोठ्या झालेल्या एका मुलाची ही कथा आहे. ओमकार अशोक शेळके असं त्याचं नाव. लहानपणापासून तो झोपडीत राहायचा गरिबीचे चटके वर्षानुवर्ष सोसलेला असतो. एक स्वप्न पाहतो मोठेपणी डॉक्टर होण्याचं. त्यासाठी रात्रीचा दिवस करून धडपड करतो. रात्री घराबाहेर दिव्याखाली बसून अभ्यास करतो पण आपली चिकाटी सोडत नाही दहावी बारावीला उत्तम यश मिळवतो आणि वैद्यक शिक्षणासाठी प्रवेश घेतो आणि उत्तम यश प्राप्त करतो. 


Rate this content
Log in