ग्रामीण मजूर-समस्या व उपाय
ग्रामीण मजूर-समस्या व उपाय
आपला देश हा कष्टकरी श्रमिकांचा देश आहे.हयात मजूरांचाही समावेश आहे. बहुतेक मजूर भूमीहीन आहे. रोजंदारी हा त्यांचा जगण्याचा आधार आहे. त्यावर त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करत असते. त्यांनाही लोकशाहीत जगता आले पाहिजे. ह्या मजूरांच्या समस्या कोणत्या आहेत त्यावर कोणते उपाय करता येईल ही काळाची गरज आहे. हा समाज इतरत्र भटकू नये, उपासमार होऊ नये. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी अशा कष्टकरी वर्गाचे आर्थिक सर्वेक्षण करुन शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. खऱ्या गरीबाला शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.
कामाची मजूरी त्याच्या कष्टाच्या कामावर आधारीत असावी. शासकीय अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य अल्पभूधारक शेतकरी व मजूराना मिळालाच पाहिजे. कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळावे. त्यात त्यांना अनुदान मिळावे. कमी रूपयात विमा काढावा.आपत्ती काळात त्यांना तातडीची मदत मिळावी. स्त्रियांना योग्य रोजंदारी मिळावी. ग्रामीण भागात उपजीविकेचे साधन उपलब्ध करून शहराकडील कामगाराना खेड्यात ही रोजगार मिळेल.
तंत्रज्ञान विकसित करून ग्रामीण भागाला जास्तीत जास्त फायदा करण्यात यावा. दळणवळण जलद गतीने होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गानचे एकत्रित समावेशन होने काळाची गरज आहे. प्रत्येक वंचित व्यक्तीचा ग्रामीण भागात विकास झाला पाहिजे. भूमिहीन व्यक्तीला कायद्याने घर मिळाले पाहिजे. कुकुटपालन,मत्सपालन, दुग्धव्यवसाय, पशुपालन इत्यादी व्यवसायाला ग्रामीण भागात बाजारपेठ उपलब्ध व्हावी.भूमिहीन, मजूर, दिव्यांग, विधवा, यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा. तसेच त्या कामावर शासनाचे नियंत्रण असणे फार गरजेचे आहे.