Anuja Dhariya-Sheth

Children Stories Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Children Stories Inspirational

गोष्ट चिऊ-काऊचीशिकवण लाखमोलाची

गोष्ट चिऊ-काऊचीशिकवण लाखमोलाची

3 mins
304


कथा १-: आपण नेहमीच चांगले वागावे


सध्या पितॄपक्ष त्यामुळे कावळेदादांची मस्त चंगळ होती...

रोज खीर-पुरी,मस्त मस्त पदार्थ, काऊची पिले रोज स्टेटस अपडेट करत होते..

चिऊ-चिमणा यांची तब्येत बिघडली होती,त्यात खूप ऊन, चिऊची बाळ अगदी मऊभात खावून कंटाळली होती..

रोज असे फोटो बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटत होते..एवढूसा चेहरा करून बसली बिचारी...

शेजारच्या खिडकीतून काऊ बघत होता,त्याला दया आली, त्याने भरपूर खीर आणली आणि चिऊच्या बाळांना दिली. त्याच्या बाळांना मात्र राग आला..कशाला दिली खीर? चिऊ कशी वागली होती तुमच्यासोबत? त्यावर काऊने समजावून सांगितलं,कोणी कसेही वागले तरी आपण नेहमीं चांगले वागावे,"कोणी कितीही काटे पसरले तरी आपण नेहमीच फुले पसरावी" कोणाच्या जखमेवर कधीच मीठ चोळू नये, उलट मायेने फुंकर मारावी...

काऊची पिल्ले हसली,त्यांना मनोमन पटले होते.


कथा २-: ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये..


चिऊचे घर मेणाचे असते,अन कावळ्याचे शेणाचे हे तर आपल्याला माहीती आहे.ऊन्हाळ्यात खूप कडक ऊन होते..एवढ्या ऊनाने चिमणीचे मेणाचे घर वितळून गेले..


चिऊताई,पिल्ले याना उन्हाचे चटके सहन होत नव्हते,त्यांना जखम झाली..काऊ लगेच उडत उडत आला,आपल्या चोचीने त्यांच्या अंगावर पाणी ओतले,त्यांना खायला दाणे दिले,प्यायला पाणी दिले...

तिला मलम लावले,पिल्ले खूप घाबरली होती..कारण चिऊताईला खूप लागले होते...पण काऊ त्यांना धीर देत होता..त्यांनी मायेने जवळ घेतले,चिऊ शुद्धीवर येईपर्यंत पिल्लांची खूप काळजी घेतली...


शुद्धीत आल्यावर चिऊने कावळ्याचे आभार मानले,आणि म्हणाली लहानपणापासुन तुझ्याबद्दल वाईटच ऐकले होते,पण आता पटले,कोणत्याही व्यक्ती विषयी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कधीच कोणते मत बनवू नये आणि त्याला नाव ठेवू नये...


कथा ३-: रंगात काय आहे?


चिमणराव आणि कावेरीबाई याना दोन जुळ्या मुली झाल्या,एक अगदी गोरीपान,अन एक गव्हाळ त्यामुळे त्यांना लाडाने चिऊ-माऊ बोलायचे सर्व...सासूबाई जुन्या विचारांच्या वंशाला दिवा हवाच...चिऊ-माऊ थोड्या मोठ्या झाल्या आणि गोड बातमी आली,लगेच नवस बोलल्या..देव पावला मुलगा झाला,पण रंग अगदी काळा जणू कावळा..


लोकं चिडवत असत,चिऊ-माऊचा भाऊ काऊ...त्याला खूप वाईट वाटायचं,तो आईजवळ जाऊन रडायचा,आईने समजावून सांगितलं"बाळा,देवासारखा देव विठोबा तो काळा..अन रंगात काय आहे? रंग कोणताही असो,कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.....बाह्यरंग गोरा असून काय उपयोग?? मनामधील काळ्या-सावळ्या विचारांची सावट काढता आली पाहिजे,आपली ओळख ही कर्तॄत्वावर मिळवायची असते....!!!"


आज एक कर्तॄत्ववान पोलिस आॅफीसर म्हणून त्याचा सत्कार झाल्यावर,आईच्या फोटोसमोर उभा राहून तिच्या आठवणीत तिचा काऊ रडत होता.....



कथा ४-: प्रेम आंधळे असते....



चिमणराव आणि चिमणीबाई यांची चिऊराणी आता मोठी झाली होती,वयात आली होती...दिसायला सुंदर आणि नाजूक...कोणीही प्रेमात पडेल अशी...


एक बगळा तिच्या मागे होताच,तीच्याही नकळत...चिमणराव आणि चिमणीबाई मस्त बाहेर फिरायला गेले होते युरोप टुरला...हे बघून लगेच त्या बगळ्याने संधी साधली...गोड बोलुन घरात प्रवेश मिळवला..तिला गुंगीचे औषध देऊन तिचा गैरफायदा घेतला,सर्व महत्वाचे पेपरसुद्धा घेतले अन खोटे अकाउंट काढून सगळे पैसे घेऊन फरार झाला..


टुर संपली अन घरी आल्यावर चिमणरावांना नोटिस आली बँकेतून..तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला..चिऊराणीने न डगमगता सर्व हकीकत सांगितली..तिला समजले तो एक डोमकावळा होता...लगेच पोलिसात तक्रार केली,पोलिसांनी त्या बगळ्याचे रूप घेतलेल्या कावळ्याला पकडले....अन पुढचा सर्व अनर्थ टळला...



साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 

सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


© अनुजा धारिया शेठ


Rate this content
Log in