Navanath Repe

Others

5.0  

Navanath Repe

Others

धर्माच्या ठेकेदारांपासून

धर्माच्या ठेकेदारांपासून

3 mins
1.8K


आज देश हा आराजकतेच्या दिशेने चालला आहे त्याबद्दल शंकाच येत नाही. या देशातील काही धर्ममांर्तडांनी जातीय दंगली घडवण्याचा जणु काही विडाच उचलल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
आतापर्यत महाराष्ट्रातील तसेच संपुर्ण देशातील तमाम हिंदुवाद्यासमोर एकच प्रश्न समोर येत आहे तो म्हणजे राममंदीराचा , यांच राममंदीराच्या वेडासाठी आजपर्यत कित्येक लोक मारले गेलेत , त्यांच्या घरादाराची राखरांगोळी झाली तशीच आपल्या घराची पण होईल याबद्दल कोणाच्याही मनात भावना निर्माण होत नाही हिच गोष्ट समजत नाही . राममंदीराच्या दंगलीत कित्येकांची पत्नी विधवा तर कित्येक मुले काही सेकंदात अनाथ झाली , रस्त्यावर माणसांच्या मांसाचे ढिग आणि रक्ताचा सडा पडला. चोहिकडे नुसत्या कतलीच कत्तली झाल्या. देशभरात धार्मिकतेचे नुसते काहुर माजले. याचाच फायदा म्हणुन दाऊदने देखिल देशात बाँम्बस्फोट घडवुन आणले. या राममंदीराच्या नादात थोडे नव्हे तर तब्बल ६७००० हजार लोक मारले गेले. मात्र त्यात कोणताही राजकीय नेता अथवा कोणताही धार्मिकतेचा टेंबा राजकीय मिरविणारा पुढारी मारला गेला नाही. या प्रश्नाचे उत्तर मात्र शुन्य मिळेल का ? या लोकांना नकोय का राममंदीर त्याना पाहिजे पण ते दुस-यांच्या बलीदानावर मिळणारे मात्र ते स्वतः कधीच बलीदान देत नाहीत ही गोष्ठ आपल्यातील बहुजनांच्या मुलांना केव्हा समजेल हाच प्रश्न नेहमी पडतो.
आपल्या लोकांना स्वतःची चुल पेटवायची मारामार असणारे लोक पण राममंदिराच्या नावावर आम्ही राममंदीर बांधुच अशा बाता मारताना दिसतात ही मोठी शोकांतीका आहे. त्याचवेळी मात्र वरील उल्लेख केलेल्यांच्या घरातील मुले ही एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. सारख्या मोठ्या परिक्षेचा अभ्यास करून ते परिक्षा देऊन उच्च अधिकारी पदावर स्थानापन्न होतात.
अरे जे धर्माचे ठेकेदार आहेत, ज्यांना पुजेचा अधिकार आहे, जे देवाच्या नावावर बहुजनांची फसवणुक करतात ते लोक राम मंदीरासाठी कधीच मेलेले अथवा मरत नाहीत , आणि ज्यांच्या हातच्या नैवेद्याने देव बाटतो त्यांची मुले मात्र राममंदीराची भाषा करतात.
ज्या - ज्या गावातील धर्माच्या ठेकेदारांनी मंदीराच्या नावाखाली कारसेवक म्हणुन बहुजनांच्या मुलांना आयोध्येला नेले ते सगळे धर्माचे ठेकेदार सगळे जिवंत घरी आले. पण धर्माचे ठेकेदार सोडुन बहुजनांची मुले कापली गेली त्यांचे काय ? किती हा नालायकपणा आहे. हे सगळे बंद करून आता आपल्या मुला - मुलींना सत्य काय ते सांगुन शिकवले पाहिजे जेणेकरून ते या धर्माच्या ठेकेदखरांच्या नादी लागणार नाहीत. अडचणीच्या वेळी कोणता देव किंवा धर्माचा ठेकेदार हा तुमच्या मदतीला येणार नाही. असं जर असलं तर ज्या बहुजनांच्या मुलांना रामाविषयी प्रचंड भक्ति भाव व आदर होता. जे बहुजनांची मुल अक्षरशः रामाच्या राममंदीरासाठी मरत होती तेव्हा राम कुठे गेला होता ? का आला नाही तो मरणा-या बहुजन तरूणांच्या मदतीला ?
काल परवाची गोष्ठ याच धर्माच्या ठेकेदारांच्या देवाच्या मंदीरात एका आसिफा नावाच्या छोट्या मुस्लीम मुलीवर बलात्कार झाला त्यावेळी धर्माच्या ठेकेदारांचा देव कुठे बसला होता ? का आला नाही तो कोवळ्या आशिफा ला वाचवायला, कुठे बसला होता ? मात्र हेच धर्माचे ठकेदार त्या मुलीची जात पाहु लागले हा त्यांचा नालायक पणा नाहीतर काय ? , शेतकरी रोज झाडाला फाशी घेऊन आत्महत्या करतोय तेव्हा हाच देव कुठे लपतो ? त्यामुळे बहुजनांनो स्वत: चा उद्धार स्वत: च करावा लागतो.
आजपर्यत देव कोणच पाहायला नाही देव पहायची वस्तु नाही असे संत गाडगेबाबांनी आणि देव दिसल्याशिवाय त्याला मी माणनार नाही असे डाँ. आंबेडकरानी सांगितले तरी मात्र येथिल काही धर्माच्या ठेकेदारांचे काही राजकीय पुढारी आमदार सुरेंद्र सिंह हे देव हा संविधानापेक्षाही मोठा आहे असे बरळतात त्यावेळी यांच्या बैध्दीकतेवरच मला प्रश्न निर्माण होतो.
आता बहुजनांच्या मुलांनी आपल्या महापुरूषांचे उपलब्ध असलेले लिखाण व सत्य इतिहास वाचलाच पाहिजे तर तो नुसता वाचून भागणार नसुन इतरांनाही सांगण्याचे मनात धाडस निर्माण करून येणा-या पिढीतील बहुजनांच्या घरातील तरूणांना या धर्माच्या ठेकेदारांपासुन आलिप्त राहण्यास मदत होईल.

" शायर हु मैं फर्ज है मेरा आयना दिखाना , मैं लाशों पर गझल कर नही सकता , इस जुल्म की जो सजा दो मुझे , लेकिन मैं जुल्म पर कभी खामोंश रह नही सकता !! " "


Rate this content
Log in