Vilas Kaklij

Others

3  

Vilas Kaklij

Others

धन्य ते बालपण

धन्य ते बालपण

2 mins
298


बालपणाच्या आठवणी मित्रहो बालपणीचे सुरेल जीवन , रंगीन जीवन कोणत्याही प्रकारची काळजी नाही .चिंता नाही . फक्त स्वच्छंदी मुक्त असे .निरपेक्ष जीवन फक्त , खाणे ,पिणे अन् बागडणे ,बस बालपणी झेडपीच्या शाळेत इ.४थी ला असतांना वर्गात आम्ही लोखंडी खुर्चीची  घडी करून दोन मुलं पुढे आणि दोन मुलं मागे आणि एका मुलाला वरती बसून त्याचे दप्तर ठेवून अंतयात्रा ची गमंत करत गोंधळ चालु होता आणि इतर मुले " राम बोलो भाई राम "असा वर्गात फिरून मयत यात्रा चालु असतांना अचानक समोर बसलेल्या एक व्यक्तीने शाळेतील गोंधळ बघितला आणि बाहेरून दाराची कडी घालण्यापूर्वी सगळ्यांना एकदा जोराने तडाके दिले.ते आजही आठवतात आणि जेव्हां गुरुजी वर्गातआले त्यांनी परत सत्कार मूर्तींना खूप प्रसाद दिला कारण सदर व्यक्तीने मूले कशा पद्धतीने गोंधळ घातला. त्याच्यां पालकांना तुम्ही वर्गात आणत नाही तोपर्यत शाळेते येवू देवू नये अशी धमकी मिळाली असल्यामुळे व गुरुजींनी विद्यार्थ्यांनां धारेवर धरले. वर्गामध्ये शाळा सुटेपर्यत रांगेमध्ये अंगठे धरण्यास सांगितले .आजही अंत यात्रा पाहिल्यावर आठवण येते ती वर्गमित्रांची व गुरुजींनी दिलेल्या प्रसादाची आणि दुसरा प्रसंग म्हणजे साक्षात पूर्नजन्म !आज वाटते कि कुणाच्या तरि पुण्याईने आपणास जीवन मिळाले नेहमी प्रमाणे शाळेत परिपाठ झाला व गावात दोन वर्ग भरत असल्याने रोज  रांगेत विद्यार्थी रांगेत येत असंताना त्याच रस्त्याने शेजारील वसती वरिल धनगर लोक दळण दळण्या साठी घोडयावर येत असंताना त्यांचा घोडा अचानक  उधळला व मुलांच्या रांगेत घुसला मुले घाबरली ' धडपडली काही पळाली त्यात मला डोक्याला घोडयाची लाथ बसली व मी बेशुध्द झालो मला घरि आणले व तेथुन दवाखाण्यात नेले.मला जेव्हां जाग आली तेव्हां मात्र त्या घटनेपासून या क्षणापर्यत एखाद्या सिनेमाचा रिळ तुटला व नंतर जोडला तेव्हां ती स्टोरी चालु होते तसी स्मृती माझी तुटली मला मधल्या काळातील घटना मला आठवत नव्हती .मी माझे दप्तर मागू लागलो तेंव्हा परत गोळ्या देवून मला शांत झोपवले गेले. दुसऱ्या दिवसी मात्र मी बरा झालो सगळे गुरुजी. नातेवाईक बघायला आले. तेव्हा मला वरिल सर्व हकिगत कळाली.व आजही घोडा ,लग्नाची वरात , दिसली कि अगांवर काटा येतो.असे रंम्य ते बालपण कटू पण सत्य त्या आठवणी आठवल्या कि ? वाटते नको त्या आठवणी. पण आजही वाटते कि आई वडिलांच्या पूण्याईने व गुरूजंनाचा .आर्शिवाद होता .म्हणून आज आठवणी आठवू शकलो व सांगू शकलो तरी ही वाटते. लहान पण देगा देवा तुझा विसर न न व्हावा . गत स्मृतींना उजाळा हाच भावी जीवनाचा उजेड व्हावा. सुखद आंठवणीचां व्हावा बोनस .जीवनाच्या आयुष्याचा प्रवास हा आठवणींच्या खुणा ह्या पुढील मार्ग व दिशा ठरवतात व भावी जीवनाचा प्रवास आंनदी होतो . व हा मानवी जीवन प्रवास , क्षणभगूंर जीवन असतांनाही तो मार्गदर्शक आढवणींचा इतिहास व्हावा .व रम्य ते बालपण धन्य व्हावे सर्वांचे हेची दान देगा तू आम्हां तुझ्या या मानव रूपी बालकाशी  हिच याचना या विलासी बालकाची      ...... 

-----------------------------------

श्री . काकळीज विलास यादवराव



Rate this content
Log in