धक्का
धक्का
अनंत हा कुलकर्णी काका-काकुंचा एकुलता एक मुलगा खुप हुशार होता, वाचनाची आवड, खेळात प्रविण, शाळेत सर्वांचा आवडता, कधी कोणाचा अनादर न करणारा. मेरिट मधे आलेला.
दहावी नंतर तो स्वतःतच रमलेला असायचा, काका काकूंना वाटायचे तो अभ्यास करत असेल, नविन अभ्यासक्रम, नविन मित्र मैत्रिणी, त्यामुळे थोडा अबोल झाला असेल.
याच्याशी बोलायला गेले की तो नीट बोलायचा नाही.
कॉलेजला जायला तयार व्हायचा पण जात नसायचा कंटाळा आला तर कधी आज लेक्चर नाही अशी कारणे देत टाळा टाळ करायचा.
नवीन अभ्यासक्रमामुळे अभ्यास शिकवायला कोणी एक चांगले शिक्षक नव्हते...
तरी तो आपल्यापरीने अभ्यास करायचा.. वर्गातील काही मुल अभ्यास न करता, कँटिन मध्ये बस, येणार्या जाणार्या मुलामुलींची छेड काढ असे करत टाईमपास करायचे,.. ते ह्याला ही बळजबरीने सोबत घ्यायचे, जर शिक्षकांनी रागवले तर हुशार मुलामुळे टग्या मुला मुलींवरचा चा राग शिक्षक अनंतवर काढत.
अनंतला आवडायचे नाही पण त्याच्यात तेवढी हिंमत ही नव्हती की त्या टग्या मुलामुलींना नाही म्हणायची म्हणून तो कॉलेजला जायचे टाळायचा.
परीक्षा होती म्हणून तो आज खूप दिवसांनी कॉलेजला पेपर सोडवण्यासाठी गेला.
अभ्यास झाला नव्हताच पण जसे येईल याप्रमाणे पेपर सोडवू असे मनाला समजवत तो कॉलेजला पेपर सोडवण्यासाठी गेला. नेमका त्याचा नंबर त्या अभ्यास न करणार्या मुलांच्या मध्ये आला! त्या मुलांचे आधीच ठरले होते कॉपी करायचे त्याप्रमाणे त्यांनी विविध मार्ग अवलंबुन कॉपीचे साहित्य सोबत ठेवले होते व ते एकमेकांना पुरवत होते.
शिक्षक वर्गात मुलांवर लक्ष ठेवत असतांना अनंतला त्यांनी पकडले. अनंतच्या बाकाजवळ कॉपीचे सर्व कागद होती. अनंतनेच कॉपी केली म्हणून त्याला गुन्हेगार बनवत शिक्षकांनी त्याला पकडले, पूढचा पेपर लिहू दिला नाही. प्राचार्यांच्या खोलीत घेऊन गेले!
इकडे आपण कसे वाचलो अनंतमूळे आज करत ती टूर मुले मुली आपला आनंद व्यक्त करत होती.
अनंत प्राचार्यांना सांगत होता मी कॉपी केली नाही, ही कागदे माझी नाही, पण शिक्षक प्राचार्य त्याचे एकायला तयार नव्हती. त्याला पूढचे पेपर देण्यास मनाई केली.
आधीच वैतागलेला, अवघडलेला अनंत या घटनेमूळे अजूनच घाबरला, न केलेल्या गुन्हाची शिक्षा भोगत होता, त्यामुळे त्याच्या मनावर आघात झाला,त्या धक्यातून सावरलाच नाही!
काका-काकूंनाही धक्का बसला, आपला मुलगा कॉपी करणारा कसा काय निघाला, आपणच संस्कारात कमी पडलो म्हणत अजूनच दुःखी झाले.
अनंत तर पार खंगून गेला होता.
अनंतला कॉपी प्रकरणात गुन्हेगार ठरवले हे त्याच्या शाळेतील पाटील सरांना समजले, त्यांनाही अनंत सारखा मुलगा असे करेल असे वाटले नाही धक्का बसला त्यांना, त्यांनी अनंतची घरी जाऊन भेट घ्यायचे ठरवले. अनंतला विश्वासात घेऊन सगळे विचारले, अनंतलापण त्यांच्याशी बोलून छान वाटले. थोडे मन मोकळे करता आले!
कॉपी वरच्या कागदांवर तुझेच अक्षर आहे, ते तुझे आहे का? तो म्हणाला मी माझी वही, नोटस् माझ्या मित्रांना दिल्या होत्या त्यांनी मागितल्या म्हणून. त्यातला एक मित्र हुबेहुब माझ्या सारखे अक्षर काढून दाखवत होता, याने त्या नोटस् त्याच्या अभ्यासासाठी तयार केल्या होत्या असे मला आठवत आहे. ह्या बघा माझ्या नोटस् माझ्या घरातच आहे, ही बघा ही वही, तो सरांना एक एक करून सांगु लागला! सरांनी पण ते बघितले. परीक्षेच्यावेळी हीच मुले माझ्या मागे पुढे आजू बाजूला बसली होती.
पाटीलसरांनी घटनाक्रम लक्षात घेतला व ठीक आहे बघू काय करता येत पुढे म्हणत, अनंत व कुलकर्णी काका काकूंचा निरोप घेतला.
पाटील सर अनंतच्या कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना भेटले, ते दोघे एकमेकांना ओळखत होते आधीपासून.
पाटीलसरांनी अनंतचा विषय काढून अनंत हे करू शकत नाही तुम्ही फेर विचार करा, त्याच्या आजुबाजुला बसलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करा.
प्राचार्यांनी फेर वाचार करत चौकशीचे सुत्र फिरवले... आणि दोष दुसर्या विद्यार्थांचा आहे. अनंतने गुन्हा नाही केला हे सिद्ध झाले.
पण वेळ निघुन गेली होती... वर वर जे दिसत यावरून गुन्हेगार ठरवल म्हणून प्राचार्यांनापण धक्का बसला, आपण कसे काय चुकलो आपला तपास करतांना, कोणावर विश्वास ठेऊन घाईत निर्णय घेतला?
त्या धक्क्यातून तेही सावरले गेले नाही कॉलेजने त्यांनाही प्राचार्य पदावरून कमी केले!
जे वर वर आपण आपल्या डोळ्यांनी बघतो ते निट तपासून, कोणती परिस्थिती आहे हे समजून उमजून निर्णय घेणे कीती महत्वाचे असते आयुष्यात! आपल्या घाई गडबडीतील निर्णयामुळे कोणाचे आयुष्य उध्वस्त होऊ नये असा निर्णय घेण्याची क्षमता सर्वात रूजू दे अशी देवा जवळ पार्थना पाटीलसर करत होते.
