देश विकास देश संरक्षण
देश विकास देश संरक्षण


भारत देश पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर विस्तारलेला आहे. भारताने तंत्रज्ञानात प्रगती केल्यामुळे देशाला एक नवे वैभव प्राप्त झाले आहे. आपल्यावर वेळोवेळी आक्रमण करून शत्रू राष्ट्र आपले मानवी व युद्ध सामग्री नष्ट करत आहेत. त्यांना धड़ा शिकवण्यासाठी भूगर्भ शास्राच्या आधारे ,अंतर्गत वायुसेना, स्थलसेना,नौसेना
यांना प्रबळ करून भूगर्भात सज्ज ठेवणे काळाची गरज आहे. लांब पल्ल्याच्या दळण व्यवस्था ,महामार्ग, रेल्वे मार्ग, नदया जोड़ प्रकल्प भूगर्भातून शक्य होऊ शकेल.
देशात ओढ़वणाऱ्या अंतर्गत समस्या निवारण जलद गतीने पूर्ण होऊ शकतात. पूर, भूकंप, त्सुनामी, दुष्काळ या आपत्ती निवारण्यासाठी मदत होऊ शकेल.शत्रू राष्ट्राकडून अणु बॉम हल्ला झाल्यास लोकांना भूगर्भातील जागेचा वापर करता येईल. दुष्काळ ग्रस्त भागाला जलद पाणी पोहचेल. प्रदुषणास आळा बसेल. वेळ, इंधन, पैसे यांची बचत होईल. भूगर्भशास्त्र मानवाला विकासासाठी फार मोठी संधी आहे. सौर उर्जेचा वापर भूगर्भ विकासात करता येईल. शत्रूची युद्धसामुग्री आपण सहज नष्ट करू शकतो. भारतातील अती महत्त्वाच्या व लोकसंखेच्या शहराना परमाणू हल्ल्यापासून वाचण्यासाठी भुयारी मेट्रो, रेल्वे मार्ग यांचा विकास करणे काळाची गरज आहे. भारताच्या चारी दिशात विकास करता येईल. नैसर्गीक साधनांचा पुरेपुर वापर करता येईल. वाळवंटी प्रदेश, डोंगराळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश विकसित करण्याची योग्य संधी आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल. मिलिट्रीसाठी अंतर्गत बंकर उपलब्ध करून देश विकासाबरोबर देश संरक्षण प्रबळ होईल.