kanchan chabukswar

Others

4.5  

kanchan chabukswar

Others

ड्रॉप्स आणि घोळ......... सौ कांचन चाबुकस्वार

ड्रॉप्स आणि घोळ......... सौ कांचन चाबुकस्वार

2 mins
397


वृद्ध व्यक्तींच्या हातून बराच वेळ झाला खूप विचित्र घोळ होतो, होणाऱ्या दुर्घटना गुंतागुंतीच्या होतात. डॉक्टर म्हणून आलेल्या पेशंटला तपासताना त्यांना मानसिक आधार देणे हे फार गरजेचे ठरते. 


परवाचीच गोष्ट, शेजारच्या काकूंचा मागच्या महिन्यात माझ्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं, सगळे व्यवस्थित होऊन त्या घरी गेल्या होत्या. काकांना मी, डोळ्यात घालायची ड्रॉप्स नीट समजावून सांगितले होते. प्रत्येक ड्रॉप वरती केव्हा घालायचा आणि किती थेंब घालायचे हे देखील लिहून दिले होते. वृद्ध व्यक्तींचे विसरायचं पण वय असतं त्याच्यामुळे औषधांचा तक्ता असणं फार गरजेचं असतं. 

परवा रात्री काकांच्या ओरिसा मध्ये राहणाऱ्या मुलीचा रडक्या आवाजातला फोन आला, अरेच्या, काका काकू ठाण्यामध्ये होते, मग मुलीने मला कशाला फोन केला? 


 बोलताना एक शॉपिंग न्युज कळली, काकांना सर्दी झाल्यामुळे त्यांनी केमिस्टकडून निलगिरीच्या तेलाची बाटली आणली होती. निलगिरीच्या तेलाची छोटी बाटली त्यांनी नेहमीप्रमाणे औषधांच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. बाटलीचे पण हिरवट झाकण तर डोळ्याच्या औषधाचे तसेच झाकण होते. नेहमीप्रमाणे रात्री झोपायच्या वेळेसचे काकूंचे डोळ्याचे ड्रॉप्स टाकताना काय घोटाळा झाला माहित नाही पण काकांनी त्यांच्या डोळ्यात निलगिरीच्या तेलाचे 2,2 थेंब टाकले. आणि झाले, काकूंचे डोळे बंद झाले, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या, रात्री अकरा ची वेळ काकांना काय करावे कळेना, त्यांनी ओरिसातल्या मुलीला झालेला प्रकार सांगितला, आणि तिने मला फोन केला. 


मुलींनी घाईघाईने पहाटेचे विमान गाठून दुसऱ्या दिवशी आई वडिलांचे घर गाठले. आई आता आंधळी होते की काय! या विचाराने स्मिताच्या डोळ्यात धारा लागल्या. तिच्या येण्याची वाट न बघता मी स्वतः जाऊन काका-काकूंना हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो. 

डोळ्यात तेल टाकण्याची घटना मी पहिल्यांदाच बघत होतो. काका हार्ट पेशंट होते, जाम घाबरले होते. माझ्या काही मित्रांना फोन करून सर्वांना विचारून एक मताने काकूंच्या डोळ्यावरची ट्रीटमेंट ठरवली आणि सुरू केली. 

काकूंचे डोळे नैसर्गिक पद्धतीने घट्ट बंद झाले होते. डोळे उघडून त्यांना धुणे गरजेचे होते, सर्व मित्रांच्या सल्ल्याने मी उपचार सुरू केले आणि सकाळी काकूंना माझ्या देखरेखीखाली ठेवून घेतले. स्मिता मुंबईला पोचायच्या आधीच काकूंनी व्यवस्थित डोळे उघडले होते, डोळ्यात लालसरपणा होता पण तो कमी होण्यासाठी म्हणून औषधोपचार सुरू केले होते. 

म्हाताऱ्या काकांना अपराधीपणा मुळे एवढी खजील केले होते की काकूं पेक्षा मला त्यांनाच सांभाळावे लागले. स्मिता आल्यावर की मी तिला बाजूला घेऊन काकू सुखरूप असल्याचे सांगितले आणि खबरदारीचा उपाय म्हणून काकां कडे याबाबतीत न बोलण्याचे सांगितले. 

 सारखी झाकणं असलेल्या बाटल्या मुळे असले घोटाळे कोणाच्याही कडे होऊ शकतात त्यामुळे सर्वजण सावधान.


Rate this content
Log in