Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.
Read #1 book on Hinduism and enhance your understanding of ancient Indian history.

Anuja Dhariya-Sheth

Others


3  

Anuja Dhariya-Sheth

Others


भावंडामुळे समज-गैरसमज

भावंडामुळे समज-गैरसमज

5 mins 233 5 mins 233

मनालीच्या खोलीत साफसफाई करताना तीच्या आईला वही सापडली, त्यात तिने बरच काही लिहून ठेवले होते, आठवीच्या मुलीला असे प्रश्न का बरे पडले असतील?

वाचून प्रश्न पडला असेल नाही तुम्हाला पण, पण ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल का? तुम्ही सुद्धा विचारात पडलात ना.. थांबा सर्व सांगतें..काय झाल तें..

तर मनालीने वहीत लिहिले होते आपल्या धाकट्या भावांबद्दल.. मनालीला दोन जूळी भावंड होती, तीच्यापेक्षा लहान.. तें झाल्यापासून आई त्यांचे कसे लाड करते, मला काम सांगतें अशा अनेक गोष्टी तिने लिहिल्या होत्या.. मी आईला काही बोलले की, आई म्हणते तुझेच लाड जास्त झालेत पण आई म्हणते तें खर की मला वाटतंय तें खरे.... सगळे म्हणताना असच म्हणतात तुझे किती लाड झाले एकटीच होतीस ना.. पण आता मात्र मलाच समजून घ्यायला लागतें सर्व... आई माझी तशी त्यांची तरी नियम मात्र मला वेगळे आणि त्या दोघांना वेगळे... असे का? मी मोठी म्हणून का? मला ना खूप राग येतो आईचा... तिचे माझाशी पण तेच नाते आहे ना मग् अशी का वागते...

तें वाचून आईला प्रश्न पडला की हिची समजुत कशी काढायची? आईने एक युक्ती केली, रविवारी मावशीला बोलवून घेतले. मावशीला आधीच सर्व कल्पना दिली होती, त्यामुळे ठरवल्याप्रमाणे मावशी आली आणि मग् बोलता बोलता सुरुवात केली त्यांनी नाटकाला.. मनाली तिथेच होती.

मावशी म्हणाली, ताई तुझे खूपच लाड झालेत हा.. मोठी म्हणून तसे माझे नाही झाले अस मला नेहमीं वाटायचं.. कारण मोठ्या मुलांचे खूप लाड होतात लहानांचे नाही असं आपण खूप वेळा एकायचो, पण खरच असे असतं का तें आपल्याला आपण जेव्हा आई बाबांच्या ठिकाणी येतो तेव्हाच कळते, त्यांना आपली सगळी मुले समान असतात तें कधीही भेदभाव करत नाहीत. मनालीची आई म्हणजेच नयना म्हणाली अगदी बरोबर बोललीस... कारण फरक असतो तो EXITEMENT N EXPERIENCE इतकाच...

म्हणजे काय ग?... मावशी. मनाली अगदी मनापासून ऐकत होती..

आई म्हणाली, पहिल्या वेळेला पहिला अनुभव, बाळाप्रमाणे आई देखील नव्याने सर्व काही शिकत असते, त्यामुळे भीती, टेन्शन,काळजी ह्या सर्व गोष्टींचे प्रमाण जास्त असते, आपल्याला हे जमेल ना आपण कोठे कमी नाही ना पडणार? त्यामुळे ती थोडी जास्त काळजी घेते बाळाची मग् मुलगा असो किंवा मुलगी आईला आपले बाळ हे प्रिय असतेच, अन पहिलटकरीण म्हणून डोहाळे पुरवले जातात, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हि जोरातच केला जातो, दोन्ही बाजूचे पहिलच बाळ असेल तर काही विचारूच नका... हो ग, मावशीने पुढे बोलायला सुरुवात केली. आत्या, काका, मामा, मावशी ह्यांना तर त्याला कोठे ठेऊ अन् कोठें नको असे होऊन जाते... मनाली तुझ्या वेळेस अगदी असेच झाले होते हो... खूप सारी खेळणी, खूप सारे कपडे, जे नवीन दिसेल तें तुझ्यासाठी आणायची धडपड सुरू असायची आमची.. किती लाड केलेत आम्ही तुझे.. आमची लग्न झाली नव्हती त्यामुळे आम्ही मोकळे होतो.. मामा तर तूला किती फीरवायचा...

मनाली हसत हसत सर्व ऐकत होती...

आई म्हणाली.. बारसे, वाढदिवस सगळे कार्यक्रम जोरात सेलेब्रेट केले होते.. हळू हळू तू मोठी झालीस अन् तुझ्या बाळ लीला सगळेच एन्जॉय करत होते... सगळ्यांनाच तू कधी उपडी होतेस, कधी रांगतेस, कधी दुडू दुडू चालतेस, कधी बोलतेस असे होऊन गेले होते... तूला बरे नसेल तर अख्खं घर उदास होऊन जायचं. तू शाळेत जायला लागलीस तेव्हा ते ही वेगळ्या प्रकारे सेलेब्रेट होत होते कॊणी बॅग नवीन आणतय, तर कॊणी टिफीन कॊणी वॉटर बॉटल तर कोणी अजून काही... असे खूप सारे लाड झालेत तुझे.... मनालीला खरच खूप छान वाट्त होते ऐकताना...तूला सांगतें नुतन, त्यात हल्ली दुसरा चान्स घेणारे फार कमी आहेत तरी पण जे घेतात त्यांचे अनुभव असेच काहीसे असतील बघ... आई म्हणाली

हो ग, ताई दुसरी चाहूल लागतें तेव्हा मोठे हे साधारण 3 तें 7 या मधल्या वयात असते, पण ह्या वेळेला मात्र ती आई अनुभव असल्यामुळे थोडी रिलॅक्स असते पहिल्या पेक्षा, पहिल्या एवढा आराम पण नाही मिळत तिला, तिला पोटात असलेल्या बाळाशी हितगुज करायला हि वेळ मिळत नाही पण म्हणून तिचे प्रेम काही कमी होत नाही आता ती वेगळ्या च टेन्शन मध्ये असते, दोघांचा सांभाळ मी नीट करू शकेल का? लहान आल्यावर मोठ मूल माझ्या पासून दुरावेल का वगैरे वगैरे....

हो अगदी बरोबर बोललीस अशीच घालमेल सुरू असते आईची... नयना म्हणजेच मनालीची आई म्हणाली... पण लहान मूल जन्माला येते अन मोठ्या मुलाचा possesiveness अजूनच वाढत जातो, तो आईला जास्तच चिकटून जवळ राहूं लागत, लहान मुलाला समजत नसल्यामुळे फ़क्त भूकेसाठी तें आई करून रडते पण त्याला आई जवळ बघून मोठे मूल मात्र थोड मन खट्रटू करते ह्या दोन्हीचा समन्वय करता करता आईच्या मात्र नाकी नऊ येतात, आणि ह्या मधल्या काळात लाड करणाऱ्या सगळेच आपल्या विश्वात गुंतून गेले ले असतात, सो आईला च ह्या दिव्याला सामोरे जावे लागते. मनालीची आईच बोलत होती...

हो ग ताई, मलाही आलाय हा अनुभव... मावशी हळू हळू हे मूल सुद्धा वाढू लागते पण आता अनुभव नावाची शिदोरी असल्यामुळे आता तें कधि उपडे पडेल, कधि रांगेल याची उत्‍सुकता कमी असते कारण ठराविक वेळ आली की या गोष्टी आपोआप होतात हे आपल्याला माहीती असते बर आता पहिल्यासारखं बाहेर जायला यायला वेळ नसल्यामुळे नवीन गोष्टी आणल्या जात नाहीत, त्यामुळे आपोआप जुन्या वस्तू वापरले जातात अर्थात दरवेळी असे नाही होत, पण कधीतरी होतेच....त्याला समज येईपर्यंत त्याला त्या नवीन असतात पण समज आल्यावर मात्र मला जुने दादाला ओर दीदीला नविन असे बोलतात ही लहान मुले पण... मावशी आणि आई अगदी छान समजावत होत्या या नाटकातून.

मनाली मात्र ऐकत विचार करत होती...

आई म्हणाली, काहीस मोठ्या मुलांच्या बाबतीत होते की तू मोठा ना मग् समजून घे, तो लहान आहे आणि हे असं बोलणे लहानांना समजू लागले कि तें हळूच काहीतरी करून बाजूला होतात आणि रोश मात्र मोठ्यांना सहन करावा लागतो एकूण काय तर तूझं माझे पटेना तुझ्या वाचून करमेना असे काही असते ह्या भावंडाचे....


जस कि आपले होते, तूला आठवतय का ताई?... मावशी


हो ग... कस सांभाळल असेल आईने आपल्याला...

लहानांना वाट्त असते मोठ्या मुलांचे लाड होतात आमचे नाही आणि मोठ्या मुलांचे म्हणणे येते आम्हीच का समजून घ्यायचे??? एकूण काय तर लहान काय आणि मोठे काय दोघेही आई वडिलांना सारखेच असतात फरक असतो तो फक्त "EXITEMENT AND EXPERIENCE" हाच सो आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला हि समज येते पण आपण मोठे होईपर्यंत आई बाबांना किती त्रास होतो तें त्या जागी आल्यावर कळते... नाते तेच असले तरी नियम वेगळे त्यांना का करावे लागतात हे आता समजतय... मनालीची आई...


अगदी खर ग ताई... मावशी म्हणाली

मनालीला मात्र तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती, आई आणि मावशी हसत होत्या त्यांचे काम त्यांनी न बोलता अगदी मस्त केले होते... मनालीच्या वागण्यात झालेला बदल आईला जाणवला आणि तिला आनंद झाला.


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in