भारतीय कामगार समस्या.
भारतीय कामगार समस्या.


भारतातील तरुण पिढी आता उच्च, तांत्रिक शिक्षण घेत आहे. त्यांना रोजगार मिळणे काळाची गरज आहे. महागाईच्या काळात नोकरी, स्वताचा व्यवसाय असणे जगण्याला एक आधार आहे. तरुण ग्रामीण भागातून शहराकडे रोजगारासाठी धाव घेत आहे. त्यामुळे शहराची
अवस्था वाईट आहे.शहरांना बकालपण आलेले आहे. कामगाराना कमी वेतनात जगण्याचा संघर्ष करावा लागतो. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग्य ह्या जीवंत समस्या शहरापुढे आज ही आहेत. कामगाराना ह्या समस्ये पासून वाचविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न होणे हे तरुण पिढीसाठी फायद्याचे ठरेल.तंत्रज्ञान विकसित होत आहेत. त्याचा फायदा तरुण वर्गाला झाला पाहिजे. गावातील घरा घरात लघुउदयोग मिळाला पाहिजे .त्यामुळे ग्रामीण भागातून लोकांचे येणारे लोंढे थांबतील. ह्या कार्यासाठी लोकप्रतिनिधिची मनापासून तळमळ असली पाहिजे.
तरुण व्यसनापासून मुक्त झाला पाहिजे.संपूर्ण भारत हा लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यक्षम प्रशासन यंत्रणा कामी आणून भारत रोजगार निर्मिती करू शकतो. घरा, घरातील बेकारी दूर करू शकतो. उच्च,तांत्रिक शिक्षण ग्रामीण भागात
सर्व, गरीब वंचिताना मिळण्यासाठी लोकप्रतिनिधीचे स्थानिक पातळीवर फार मोठी जबाबदारी आहे.त्यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य मिळावे. कामगाराना स्थानिक पातळीवर
अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ,आरोग्य, शिक्षण ह्या गरजा स्वस्तात व वेळेवर मिळाल्या पाहिजेत. जीवघेण्या शहरापासून सुटका होईल.दीर्घ आयुष्य मिळेल. पर्यावरण शुद्ध व स्वच्छ राखयला मदत होईल.