बालक संस्कारापासून वंचित:कारणे
बालक संस्कारापासून वंचित:कारणे
आज धक्काधक़्क़ीच्या जीवनात, संघर्षात आई व वडिलांना दोघांनाही कामावर जावे लागते. त्यामुळे विभक्त कुटुंब असले तर आजी, आजोबांचे प्रेम काही कुटुंबात मिळत नाही. लहान मुलांना सांभाळणारे आजी आजोबा ,त्यांचे प्रेम, संस्कार मुलांना मिळत नाही. काही कुटुंबात तर आई वडिलांना वृद्धाश्रमात राहवे लागते .इच्छा असूनही घरात आजी आजोबाना घर व जिव्हाळा यापासून दूर रहावे लागते.
लहान मुलांना प्रेम व संस्कार कुणी द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुले चिडचिडी बनतात त्यांना आपल्या आई वडिलांचे प्रेम मिळत नसल्यामुळे ती रागिष्ट बनतात. ती एक
लकोंडे जीवन जगू लागतात. शाळेतही ही मुले इतरांना त्रास देतात. शाळा त्यांना नकोशी वाटते. काही कुटुंबात कोवळी मुले व मुलींना आईचे अमृतमय दूध मिळत नाही. अशी मुले शारीरिक, मानसिक, बौद्धिक, विकाराचे धनी होतात. त्यांना संस्कार व प्रेमाची फार गरज आहे.
आई वडिलांनी आपली मुले आपल्या जवळ ठेवणे फार महत्वाचे आहे.त्यांना आजी आजोबांच्या संस्काराची फार गरज असते.त्या लहान वयात मुलांना आई, वडील,आजी, आजोबा जवळ पाहिजे असतात. त्यामुळे मुले कुशाग्र बनतात आदर्श बनतात व्यसनाकडे झुकत नाही. वाम मार्गाला जात नाही. चिडचिडी व मानसिक आजाराला बळी पडत नाही.