kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

अरेंज मॅरेज...

अरेंज मॅरेज...

6 mins
243


सागर माथा हॉटेलच्या मागच्या लॉबीमध्ये, डोंगरा कडे बघत आपल्या समोरच्या थंड थंड पेयI घुटके घेत शरण्या बसली होती. मागच्या बाजूने थोड्यावेळाने विकास आला. मॅट्रिमोनी वर्ड्स वरचा कोड नंबर एकमेकांना सांगून त्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. आताच्या नवीन युगामध्ये मॅट्रिमोनी वर्ड्स मध्ये मुला-मुलींना भेटण एक नवीन सिस्टीम चालू झाली होती.


काय प्रश्न विचारायचे? काय उत्तर द्यायचे? ठराविकच प्रश्न आणि ठराविकच उत्तर. मुलासाठी तेच प्रश्न, काय करतो, कामाची वेळ काय? फॉरेन ट्रिप मिळतात का? पॅकेज काय आहे? इत्यादी इत्यादी. तर मुलींसाठी तेच प्रश्न, स्वयंपाक घर सांभाळशील ना? मी आई वडिलांबरोबर राहणार, तुझं काय म्हणणं आहे? नोकरी करणार का नाही? तेच तेच रटाळ प्रश्न.


शरण्यानी हसून सुरुवात केली," विकास तू काय घेणार? कारण तुझी वाट बघत शेवटी मी माझ्या आवडीचं थंड पेय मागवून घेतलं."

विकास ने मेनू कार्ड बघितले," खरे तर लंच टाईम झाला आहे, आपण जेवताना बोलू." त्याने दोघांसाठी मस्त कुर्मा भाजी, पोळ्या पुलाव कोशिंबीर आणि सुरुवातीला सूप अशी ऑर्डर दिली. सागरमाथा हॉटेल 3 स्टार असून शांत जागेवरती उभारलेल्या भल्यामोठ्या बागेमध्ये एका बाजूला असलेली जेवणासाठीची व्यवस्था सगळ्या लोकांना आवडे. विकासने मेनू सांगितलं असूनदेखील ऑर्डरमध्ये सुरेख दहीवडे आले, ते बघून शरण्या हसली आणि तिने वेटरला धन्यवाद दिले. जेवताना होणाऱ्या मुला-मुलींच्या नेहमीचाच गप्पा, कुठला टीव्ही चॅनल बघते? कुठली सिनेमे आवडतात? शनिवार रविवार काय करते?


जेवताना शरण्या मोघम उत्तर देत होती, शेवटी विकास म्हणाला, आमचा इथे मोठा बंगला आहे, माझा मोठा भाऊ त्याची फॅमिली,

 आईवडील आजी आजोबा आम्ही सगळे एकत्रच राहणार आहोत, तुला आमच्या घरामध्ये आनंदात राहता येईल आणि तुझी इच्छा असेल तर नोकरी पण करता येईल. दहीवडा खाताना शरण्याने बोलायला सुरुवात केली,


"मोठ्या कुटुंबाबद्दल मला तर आवडच आहे, पण माझ्याकडे आणि माझ्या वरती एक जबाबदारी आहे. पोलीस खात्यातून निवृत्त झालेले माझे वडील सध्या अतिशय आजारी असतात, आमच्याकडे पैशाची काहीच कमी नाही, माझा भाऊ परदेशी नोकरीला गेला आहे, त्याला तिथे नोकरी करणं भाग आहे, घरात आई आणि आजी असतात. कुठल्याही वेळेला, एखाद्या एमर्जन्सी ला मलाच माझ्या आई-वडिलांना मदत करावी लागणार आहे, अशा वेळेला मला असं वाटतं की लग्न झाल्यावर देखील मी त्यांच्या जवळच राहावं.


सणवार उत्सव, मंगल प्रसंग किंवा इतर कुठल्याही वेळेला मी जरूर माझ्या सासरी जाईल, तिथली पण जबाबदारी कसोशीने पूर्ण करीन, पण मला माझ्या आईवडिलांच्या जवळ किंवा त्यांच्या घरातच राहणे भाग आहे. दुसरी गोष्ट नोकरीची, मी नोकरीपेक्षा काहीतरी व्यवसाय करण्याच्या विचारात आहे, माझं त्यासंबंधीचे पूर्ण काम चालू आहे, त्याने काय होईल की मला घरी राहून देखील माझा व्यवसाय करता येईल. जेव्हा आपल्या वृद्ध आई-वडिलांना आपली गरज असते, तेव्हा आपण त्यांच्या जवळच थांबले पाहिजे." शरण्यानी सावकाशपणे आपलं म्हणणं मांडलं. शरण्या दिसायला सुरेख, गोरीपान उंच बांधेसूद असून कंप्यूटर इंजीनियरिंग मध्ये तिने डिप्लोमा घेतलेला होता.


ती घरातच राहून काही कंपन्यांची एक्सेल शीट बनवून देण्याचे काम करत होती. त्यामध्ये तिला भरपूर पैसे पण मिळत होते, परत तिचा जॉब हा जॉब नसून तिच्या स्वातंत्र्य प्रमाणे ती काम करत असे. त्यामुळे घरात आलेली अडचण किंवा घर सांभाळून तिला आपला व्यवसाय करता येत होता. त्यातून तिच्या आई आणि बाबांचं तिच्याविषयी काहीही म्हणणं नव्हतं, पण शरण्यानी नी ही जबाबदारी स्वतःहून डोक्यावरती घेतलेली होती.


विकासला तिचे म्हणणे पटतही होते आणि फारशी रुचत पण नव्हते, त्याचा एवढा प्रचंड बंगला त्याच्या वरचा हक्क सोडून देणे त्याच्यासाठी योग्य नव्हतेच. तो जर घरात राहिला असता तर आई-वडिलांनी त्याच्यावरचे पैसे किंवा बाकीची साधन संपत्ती त्याच्या नावावर केली असते पण तो घराच्या बाहेर पडला तर त्याचे वडील या बाबतीत मात्र फार निष्ठुर होते. शरण्याची एकंदरीत विचार करण्याची वृत्ती त्याला अतिशय आवडूनदेखील त्याचा नाईलाज होत चालला होता.


त्यांची ठरवलेली मिटिंग संपली, आणि दोघेही आपल्या वाटेने घराकडे निघून आले. शरण्याची आई कुठल्या ना कुठल्या मुलाचं स्थळ शोधून काढून शरण्याला त्याला भेटायला पाठवत होती. सागरमाथा हॉटेल हे शरण्या च्या बाबांच्या मित्राचं असल्यामुळे तिथे कोणालाही भेटण्यासाठी काही धोका नव्हता. परत हॉटेलच्या सी सी कॅमेरामध्ये येणारा जाणारा व्यवस्थित टिपला जात असे.


बरेच दिवस आणि बरीच मुलं बघून झाली, चांगल्या घरातली सुस्तीतितली मुलं आपल्या आई-वडिलांचे घर सोडून तयारच नव्हती, दुरवर जाणारी किंवा फॉरिन मध्ये कायम शिफ्ट अशी होणारी मुलं शरण्या ला अजिबातच नको होती. मग तिच्या मध्ये आणि तिचे भावांमध्ये काय फरक पडणार होता. तिचे बाबा एक स्वच्छ आणि सच्चे पोलिस ऑफिसर होते,शरण्यासाठी तिचे बाबा एक आदर्श होते, त्यामुळे बाकीच्या भौतिक सुखात पुढे तिला आई-वडिलांची सेवा श्रेष्ठ वाटत होती.


एका प्रचंड मोठ्या हॉटेलचे ऑडिटचे काम शरण्याकडे आले, त्यांच्या सगळ्या जमाखर्चाची तिला एक्सेल शीट बनवून द्यायची होती, त्याच्यासाठी तिला वारंवार हॉटेलमध्ये जावे लागत होते, जाताना हॉटेलचा मॅनेजर तिच्यासाठी पार्सल म्हणून काही ना काही तरी पाठवत असे. सरतेशेवटी तिचे काम पूर्ण झाले, फायनल पेपर हॉटेलमध्ये देण्यासाठी शरण्या सकाळीच हॉटेलमध्ये आली होती. राजन सरनाईक हॉटेलचे मालक तिची वाटच बघत होते, त्यांच्या हाताखाली काम करणारे चार्टर्ड अकाउंटंटने एक्सेल शीट बघितली आणि खुश झाले, जमा, खर्च, नफा, जसा सरनाईक साहेबांना पाहिजे होता तसा शरण्या ने मांडला होता. सीए शशांक, शरण्याच्या कामावर खुश झाला.


सरनाईक साहेबांनी शरण्या साठी म्हणून अजून बरंच काम शरण्याकडे सोपवलं. शशांक नुकताच सरनाईक साहेबांकडे रुजू झाला होता, त्याचं काम दुसऱ्या एका सीए फर्म बरोबर पण चालू होतं. शरण्याची काम करण्याची तयारी आणि तिच्या कामातली गती बघून शशांकने तिला बरेचसे काम मिळवून दिले. शशांक भाड्याच्या घरामध्ये राहत होता कारण त्याचे आई-वडील गावी राहत असत. हळूहळू शशांक आणि शरण्याची व्यवस्थित ओळख झाली, हॉटेलमध्ये काम करत असताना, वेटरचा देखील लक्षात शशांक आणि शरण्याची आवड असे.शरण्यासाठी दहीवडा तर शशांकसाठी फ्रुट सॅलेड नाश्त्यासाठी म्हणून येई.


दुसऱ्या दिवशी महत्वाचं ऑडिट होतं म्हणून शरण्या रात्री बसून कामाची एक्सेल शीट तयार करत होती, तेवढ्यात बाबांच्या खोलीतून विचित्र आवाज यायला लागला, त्यांच्या घशातन घरघर ऐकू येऊ लागले, ताबडतोब शरण्याव्नी डॉक्टरांना फोन करून ऍम्ब्युलन्स बोलावली. बाबांना बहुतेक हार्ट अटॅक आला होता. हॉस्पिटलमधली धावपळ करताना पहाटे शशांक चा फोन आला," झाले ना काम?"

" नाही रे, बाबांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले, डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅक आहे." शरण्या म्हणाली. शशांक ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आला, शरण्या बरोबर त्याने पण बरीच धावपळ करून बाबांना योग्य ती ट्रीटमेंट मिळेल असे पाहिले.


आई,शरण्यासाठी त्याने नाश्ता पण आणला, ज्यांचे काम होते, त्या कंपनीला शशांकने पुढची तारीख घेण्यासाठी सांगितले. त्यांनी ते काम पुढे ढकलले.

शेवटी दहा दिवसानंतर बाबा घरी आले. अंथरुणावर पडल्या पडल्या बाबांना शरण्या ची धावपळ आणि तिलाच साथ देत असलेला शशांक दिसत होता.

साधा सरळ निर्व्यसनी शशांक आई-बाबांना फारच आवडला होता.


   दिसत होतं तेवढं सगळं सोपं नव्हतं, विशेषांचे आई-वडील गावाहून त्याच्यासाठी मुली शोधत होते, त्यांच्या घराण्यात प्रमाणे आईवडीलच व्यवस्थित मुलगी शोधून, नातेवाईकांमधली मुलगी त्याच्यासाठी बायको म्हणून निश्चित करणार होते. परंपरेने चालत आलेल्या रीती आणि रूढी तोडण्याचं सामर्थ्य शशांक मध्ये नव्हतं. त्याच्या आईने तिच्या मावस बहिणीची मुलगी शशांक साठी नियोजित वधू म्हणून निश्चित केली होती. शशांकला जरी शरण्या आवडत होती तरी तो आपल्या कुटुंबा विरुद्ध जाऊ शकत नव्हता. सीमाने (शरण्याची आई) यावरती तोडगा काढला. काही कारण काढून शशांकने आपल्या आई-वडिलांना त्याच्यापाशी बोलवावे, आणि नंतर काही कारणाने शरण्या बरोबर ओळख करून द्यावी.


    दिवाळी जळत जवळच आली होती यावेळेला शशांकने दिवाळीला गावी जाऊन, शरण्याला काम करण्यासाठी म्हणून तिकडे बोलावले. शरण्याचे साधे वागणे, काम करण्याची वृत्ती, सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेण्याची तिची कला, त्याच्यामुळे शशांकची आई फारच इंप्रेस झाली. तरीपण जरी शशांकची आजी-आजोबा आणि वडील संमतीची मान डोलावली होती तरीपण शशांकची आई थोडीशी साशंक होती. एकीकडे शशांक घर जावई होणार, एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक होणार तेदेखील एवढ्या मोठ्या शहरांमध्ये, याच आकर्षण तिला फार जास्त होतं. परत त्यांचा मान तर राहणारच होता. काही नाही तर बरेच आढेवेढे घेऊन शेवटी तिने पण शशांक च्या पसंतीला मान डोलावली.


      शरण्याचे आई, बाबा, आजी खुश झाली, बाबांनी ताबडतोब वकीलाला बोलावून आपल्या बंगल्याचे दोन भाग केले, व्यवस्थितपणे शरण्याआणि तिच्या भावाच्या नावावरती समसमान हिस्से केले. शरण्या आणि शशांक आता बाबांबरोबर पण वेगळ्या घरांमध्ये राहतात. शरण्याच्या भावाला मोकळेपणाने अमेरिकेमध्ये नोकरी करता येत आहे. शशांकचे आई-वडील येऊन जाऊन असतात. घराचा प्रश्न सुटल्यामुळे शशांक आनंदाने त्याच्या बिजनेसवरती लक्ष देऊन आहे, शरण्यI जमेल तेवढेच काम करते, तिची धावपळ बरीच कमी झाली आहे. थोडीशी समजदारी दाखवली तर सगळे जण सुखी राहू शकतात.


Rate this content
Log in