अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे


अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांचे जीवन म्हणजे आयुष्याचा संघर्ष. गरीब परिस्थितील संघर्षमय लढा. त्या संघर्षातुन जे साहित्य जन्माला आले ते अमर झाले.त्यांच्या जगण्या तील जीवनगाथा भरकटलेल्या समाजाला दिशा देऊ लागल्या. समाजाची जडण घडण करू लागल्या. त्या जीवन गाथा म्हणजे त्यांच्या जीवनातील आलेल्या अनुभवांचे जीवंत साहित्य. वर्षानुवर्षे जीवंत कलेची जपलेली परंपरा.
त्यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील फार मोठी देणगी म्हणावी लागेल. वाचकांचे मन खिळुन ठेवणारी त्यांची शब्द रचना म्हणजे ग्रामीण भागातील अनमोल खजिनाच म्हणावा लागेल. त्यांच्या लोकसाहित्यात आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, कविता, पोवाडे यांचा अनमोल नजराना.जीवनपरिवर्तन करण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात व वाणीत होते. ग्रामीण व शहरी असा दुहेरी संगम त्यांच्या साहित्याने गाठलेला आहे.गोरगरीब, गांजले
ला, हताश,वंचितांच्या व्यथा त्यांच्या वास्तव लेखनीतून मांडलेल्या आहेत. सर्वांगीण कलासंपन्न यशाचे उतुंग शिखर गाठलेले व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. त्यांच्या साहित्याचे रहस्य म्हणजे ते परदेशातही अजरामर झाले. त्यांच्या जगलेल्या जीवन साहित्यावर अनेकांनी पी.एचडी केलेली आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जन्मलेला हा सुपुत्र भारत मातेला लाभला हे थोर भाग्य ह्या मायमातीचे म्हणावे लागेल. असे महापुरुष जन्माला येणे ही भारत मातेची किमयाच म्हणावी लागेल. बिघडलेल्या पिढीला त्यांचे साहित्य फार मोठे धन आहे. त्यांच्या साहित्यात जातिभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद कधीच दिसला नाही. खरे तर आजच्या पिढिचे ते ज्ञानपीठ व्यक्तिमत्व होते. तीनही काळास दिशा देणारे ,मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान हाच लोकशाहीचा सन्मान आहे. त्यांची जीवनमूल्ये जतन करणारा समाज म्हणजे त्यांचे स्मरण होय.