Neelima Deshpande

Others

3  

Neelima Deshpande

Others

अक्षर:व्यक्तिमत्वाचा एक पैलू!

अक्षर:व्यक्तिमत्वाचा एक पैलू!

3 mins
219


लहानपणी आपण अनेकदा सुंदर अक्षराचे महत्व ऐकलेले असेलच आणि त्यासाठी खुप मेहनत सुद्धा घेतली असेल. शालेय जीवनात प्रवेश केल्यापासून लिहिणे ही प्रक्रिया आपल्या जीवनात प्रवेश करते आणि मग ती जीवनात कायमच आपल्या सोबत राहते. बहुदा त्यामूळे हस्ताक्षर आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून जातो. आपल्या स्वभावाचे पैलू इतरांसमोर उलगडून दाखवण्यात देखील हे अक्षर कामी येते.अनेक शात्रांप्रमाणे एखाद्याच्या हस्ताक्षरावरुन त्याच्याबद्दल काही अचूक ठोकताळे काढत त्याच्या स्वभावाचे अनुमान याबद्दलचा अभ्यास करून सहज काढले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या वाढत्या वयानुसार व त्यांच्यात झालेल्या शारिरीक बदलांमूळे एका ठराविक काळानंतर त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात फरक पडू शकतो.


'मोत्यासारखे सुंदर अक्षर असावे!' अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या अक्षराला लहान वयातच योग्य वळण लावण्याचे कष्ट घरा घरातून मोठी मंडळी घेत असतात. चुकून जर अक्षर त्यावेळी नीट करता आले नसेल तर आपण ते आजही म्हणजे कोणत्याही वयात, मोठे झाल्यावर सुद्धा  ते वाचनीय व आधी असेल त्यापेक्षा खुप चांगले दिसेल असे करु शकतो.मेहनत घेण्याची तयारी दाखवली तर सुंदर अक्षराचा दागिना आपण सगळे कधीही मिळवू शकतो. आज या अक्षर वाचता यावे यासाठी ते नीट दिसावे म्हणून त्या प्रक्रियेला थोडे सोपे कसे करता येईल हे आपण जाणून घेऊ.


* मोकळी अक्षरं : खुप जास्त अंतर सोडून किंवा खुप जवळ जवळ, एकात एक गिचमिड करुन न लिहिता सुटसुटीत वाटतील असे 5 ते 7 शब्दच एका ओळीत लिहावेत.

* आकारमान : अक्षर खुप मोठे अथवा अतिशय बारीक काढणे टाळावे कारण जर अक्षर खुप जास्तच बारीक असेल तर ते वाचताना त्रासदायक होते.त्याचप्रमाणे अक्षर प्रमाणापेक्षा मोठे असेल तर ते बटबटीत दिसते. दोन ओळींच्या मधे जे अंतर असते, त्याला जर आपण प्रमाण मानले तर आपली अक्षरे, ही त्या दोन ओळीच्या अर्ध्या उंची मधे बसतील इतकीच मोठी असावीत.यामूळे खालच्या ओळीतील अक्षरांवर वेलांटी, अनुस्वार किंवा मात्रा देणे सोपे जाते तसेच दोन्ही ओळीतील शब्द आपल्याला सहज वाचता येतात.

* शब्दांवर रेघा देणे : प्रत्येक अ क्ष रा व र रेघा देऊन त्यांना वेगवेगळे दिसेल असे लिहिले तर ते बाराखडी लिहिल्या प्रमाणे वाटून वाचण्यास वेळ लागू शकतो. त्यापेक्षा शब्दांवर रेघा देणे सोपे जाते व ते वाचण्यास देखील अडचणी येत नाहीत.

* समान अंतर : एका शब्दातील प्रत्येक अक्षरात,ओळीतील प्रत्येक दोन शब्दात समान अंतर असावे.

* रेषा व आकार : शब्दातील आधार असलेल्या उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा ह्या सरळ-ताठ काढण्याचा सराव आपले अक्षर छान दिसावे ह्या प्रयत्नांत अर्धे काम करून टाकतात.

* वेलांटी, उकार, यांचे अर्ध गोल नेमक्या शब्दापासून सुरु होत अचूक जागी संपवावेत.

* लिहिताना मध्यम दाब देत सहजगत्या लिहावे. खुप दाबून लिहिले तर खालील दोन-तीन पानांवर अक्षरांचे व्रण उमटले जातात आणि खुपच हलक्या हाताने लिहीलं तर अक्षरे धूसर दिसतात.अनेकदा वाचणे देखील अवघड जाते.

* लिहिताना कधी चुकले व ते मिटवण्याचे साधन नसेल तर सरळ त्यावर एक आडवी रेघ ओढावी. त्याला झाकण्याच्या प्रयत्नांत त्यावर अनेक रेघोट्या ओढल्या तर पुर्ण पानावर काय लिहिले आहे हे वाचण्यापेक्षा सगळ्यांचे लक्ष त्या एका चुकलेल्या शब्दावर खिळून राहते. ह्या काही सोप्या मार्गाने आपले अक्षर आपण छान करू शकतो.अक्षर सुधारण्याच्या प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !


* सदर विचारांच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.

*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.

*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


* फोटो साभार Google and Pixabay



Rate this content
Log in