STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

ऐतिहासिक.. शिवाजी महाराज

ऐतिहासिक.. शिवाजी महाराज

2 mins
140

नीतू आणि बंटी अनिता ला विचारत होते "आई आंम्ही खेळायला जाऊ का?"

" नाही बेटा आता लॉकडाऊन चालू आहे.. आणि आपल्याला घरातच थांबायचे आहे..तरच या कोरोनाला आपण हरवु शकतो.."

पण शेवटी लहान मुलेच ती आईचे काहीही ऐकायला तयार नव्हते..आई म्हणते 'थांबा मी तुम्हांला शिवाजी महाराजांच्या कथा सांगते.आणि अणिता ने दोघा मुलांना एक एक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली..


जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास हा अद्वीतीय असा आहे.मराठ्यांचे स्वतंत्र, सार्वभौम राज्य स्थापन करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक नवे पर्व स्थापन केले. भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जाते..शिवरायांचा महत्वाचा गुण म्हणजे कमालीचा साधेपणा .सैन्यासोबत राहुन त्यांनी अनेक कसोटीच्या प्रसंगांना तोंड दिले. संपूर्ण जगातील सेना नायकांच्या यादीत शिवाजी महाराज यांचे नाव पहिल्या नंबरवर घेतले जाते. शिवरायांच्या कारकिर्दीत सामर्थ्यशाली मोगलांचा किंवा विजापुर करांचा असा एकही सेनानायक नव्हता ज्याने महाराजांचा पराभव केला होता.


शिवरायांनी नेहमीच समानतेचे तत्त्व जोपासले. सैन्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले..शहाजी राजांची सुटका,अफजल खानाचा वध, स्वतः ची पन्हाळ्यातुन सुटका, विशाळगडावर चकवा,सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका,मोगल साम्राज्यातुन सही सलामत परतीचा प्रवास या सर्व रोमांचक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या.. रयतेला लेकराप्रमाणे समजणारे हे राजे एक वंदनीय पुरुष होते.. महाराजांच्या  युद्धाचे एक तंत्र होते.ते म्हणजे गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे युद्ध न करता शत्रुला हरवण्याचे टेकनीक ..सहा महिने अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी तळ ठोकुन बसला होता.महाराजांनी तेव्हा गनिमी काव्याने योजना आखुन अफजल खानाचा पराभव केला होता.. गनीमी काव्याचे तंत्र वापरून महाराजांनी बऱ्याच शत्रुंचा पराभव केला..

आपला शत्रू पण आपल्या दाराशी उभा आहे.तो म्हणजे कोरोना.या कोरोनाशी आपल्याला समोरासमोर जाऊन युद्ध करायचे नाही..तर त्याच्या पासून आपल्याला वाचायचे आहे.. म्हणून मुलांनो आपल्याला घरातच रहायचे आहे. तेव्हा आपली त्याच्यापासून सुटका होईल. हे अनिताचे म्हणणे नीतू आणि बंटीला पटले होते.

ज्याप्रमाणे शिवरायांनी अत्यंत शांत डोक्याने सर्व शत्रुंवर विजय मिळवला.आणि योग्य राज्य स्थापन केले.त्याप्रमाणे सर्व लोकांनी आत्ताच्या परीस्थितीत संयम पाळुन घरी रहाने गरजेचे आहे...हे समजले होते... आपल्या इतिहासाचे दाखले देऊन मुलांना योग्य ती शिकवण आणि संस्कार देण्याचे कामही अनिता ने केले होते....


साहित्याला गुण द्या
लॉग इन