STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Others

3  

ऋतुजा वैरागडकर

Others

आर्थिक स्वावलंबन... गरजेचे

आर्थिक स्वावलंबन... गरजेचे

2 mins
240

मधुच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली होती ....आणि आता सहाजिकच मधुची उत्सुकता वाढली आई होण्याची .

मधुनी तशी इच्छा रमेश जवळ व्यक्त केली...

मधु: रमेश एक ना, मला तुझ्याशी बोलायचं.

रमेश: ह.....

मधु: आता आपण बाळांचा विचार करूया ना... आपल्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली अजून किती दिवस थांबायच...प्लिज विचार करना...

रमेश:ह... बघू..

रमेश आणि मधुच हे रोजचच बोलणं व्हायचं...पण रमेश सध्या तयार नव्हता. खुप प्रयत्नांती रमेश नी होकार दिला....काही दिवसांनी मधु ला दिवस गेले...मधुनी गोंडस मुलीला जन्म दिला...दिवस खुप छान चालले होते पण अचानक एक दिवस रमेश अपघातात मधुला सोडुन निघुन गेला ...मधु अगदी एकटी पडली ...

एका छोट्याशा बाळांला घेऊन अख्ख आयुष्य कसं काढायचं..हया विचारांनी मधु भांबावली होती.. पण  मधु शिक्षीत होती त्यामुळे तिला लवकरच एक जॉब ऑफर आली आणि तिने जॉब जॉईन केलं....

आता मधु आर्थिक रित्या स्वावलंबी झाली होती... पण मधुच आयुष्य सोप नव्हत....एकट्या बाईने अख्ख आयुष्य एकट्याने काढणं अवघड आहे...हळूहळू मधु यातुन सावरली ...हळूहळू मधुचे आयुष्य सुरळीत झाले..आता मधु कुणावरही अवलंबून नाही..मधुच आणि तिच्य मुलीचं जिवन छान चालले होत.

मधुची मुलगी शिखा आज मोठी झालीय.... तिनेही तिच्या जीवनात खुप उतार चढाव पाहीले. शिखा आज उच्च शिक्षीत आहे...मोठ्या कंपनीत नोकरी करते ... आणि आईला आनंद देण्याचा प्रयत्न करते.. दोघीही आज खुश आहेत... जुन्या आठवणीतुन बाहेर आल्या..

काही वर्षानी शिखा साठी लग्नाची स्थळ यायला लागली...एका ठिकाणी जुळून आल..मुलगा देखणा आणि उच्च शिक्षीत होता....काही दिवसांनी शिखा च लग्न झाल..लग्नाच्या वेळी शिखा ने तिच्या बाबांना खुप मिस केलं.. आज शिखा तिच्या आयुष्यात खुश आहे आणि मधुला शिखा च्या आनंदात आनंद आहे.....

मधु शिखा जवळ असते...अमेरिकेला ..

काही वर्षानी शिखानी छान गोंडस बाळांला जन्म दिला...शिखाला मुलगा झाला..

आणि शिखानी तिच्या मुलाचे नाव बाबाच्य नावावर ठेवले...रमेश...

आजच्या काळात शिक्षण असणं खुप गरजेचं आहे... कुणावर कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही...म्हणुन शिक्षण आणि कमावण्याचे बळ दोन्हीही असणं गरजेचं आहे ...


Rate this content
Log in