STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

आजची स्त्री सुरक्षित आहे का?

आजची स्त्री सुरक्षित आहे का?

1 min
759

  ती आई आहे . ती बहिण आहे

 ती पत्नी आहे . ती मुलगी आहे

 आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात

 सोबत असनारी ती एक स्त्री आहे .

   

    हे सर्वांना माहीत आहे . पण हेच काही व्यक्ती हे कुठपर्यंत मानतात .? 

   स्त्री ही स्त्री असते ती प्रत्येक रुपात प्रत्येकाच्या सुखदुःखात खंबीरपणे सोबत असते तरी ही तिला अबलाच मानल्या जाते .

  

" आजची स्त्री पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा सुरक्षित व स्वावलंबी आहे का ." ?

  विषय खरंच खुप सुंदर आहे .

    

    हो . आजची स्त्री ही स्वावलंबी आहे पण सुरक्षित नाही. पूर्वीच्या काळात मुलींचे बालपणी लग्न व्हायचे त्या अशिक्षित . मोठे कुटुंब त्यासाठी त्यांना खुप राबवले जात .

 त्यांना स्वातंत्र्य नव्हते पण त्या सुरक्षित होत्या . त्यांना कसली भीती नव्हती कारण त्यावेळेस हुंडाबळी व बलात्कार होत नव्हते .


   काळ बदलत गेला आणि स्त्री शिक्षणाकडे वळाली .त्या शिक्षण घेत यशाचे ध्येय गाठत गेल्या . त्या स्वावलंबी झाल्या पण सुरक्षित नाही .ती उंच झेप घेण्यापूर्वी च काही समाजकंटक पंख छाटायला तयार असतात .


 " स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले . पण कुठे "?

बऱ्याच ठिकाणी स्त्रीचे असित्व अजूनही चार भिंतीत    दडपले आहे .

 आजही स्त्री घरात समाजात सुरक्षित नाही .

विनयभंग . हुंडाबळी .बलात्काराच्या शिकार होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागतो .

   

   स्त्री आहे म्हणून विश्व आहे

     घराला घरपण आहे

    नात्यात जिवंतपणा आहे

   कोणत्याही नात्यात तिचा सन्मान करा

   हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ।


Rate this content
Log in