आईचे पत्र
आईचे पत्र
आईचे पत्र
रात्रीचे 12 वाजले आई एक नजर दारा कडे तर एक नजर घड्याळी कडे फिरवत होती . तितक्यात दाराची बेल वाजली. आई ताडकन उठून दार उघडायला गेली .
दारात मुलगा (प्रकाश ) व सून (दीपा ) यांना बघून आईने लगेच प्रश्न केला. इतका वेळ कुठे होता ? मी कधीची
वाट बघते.
आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ
अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो.
चल हात पाय धु मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच
होती
प्रकाश रूम मध्ये जाता जाता बोलत होता . मी बाहेरून जेवण करून आलो . तू झोपुन घे आणि मला ही शांत झोपू दे असे बोलत धाडकन दार लावले .
अरे मी तुझ्या आवडीची खीर बनविली आहे
अग तुला एकदा सांगितले ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता
पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती .किचनमध्ये जाऊन ऐक ग्लास पाली पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली
सकाळी प्रकाश ला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकन उठला शेजारी दीपा अजून झोपली च होती . तो उठून हॉल मध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉप जवळ असलेल्या चिठ्ठी वर गेली. कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर काय आत लिहिले होते
प्रिय बाळा
तुला माझे पत्र बघून आचर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले बोलता नसते आले का?
हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेस सारखी गाडी स्टेशन वरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे
काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनविली होती . विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रा सोबत पार्टी करून आला . तसा मला आनंदच झाला .
मी विसरली होती आता माझा प्रकाश मोठा झाला . अरे हो विसरल्या वरून आठवण झाली मी तुला मागे एक औषध ची चिठ्ठी दिली होती . मला ते औषद कुठेच मिळाले नाही
बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे.
प्रकाश ला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी आँफीसच्या बँग मधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते
मला एक औषध हवे होते. "मला मूल आहे ते विसरण्याचे" .
तसे त्याचे डोळे भरून आले .आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजुन का उठली नाही म्हणून आवाज देत होता
पण आई उठली च नाही ती कधी न उठण्या साठी शांत अशी झोपली होती.
आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून प्रकाश
हमसाहमसी रडू लागला .…
