STORYMIRROR

Ramkrushn Patil

Others

3  

Ramkrushn Patil

Others

विठ्ठला भक्त तुझा भोळा

विठ्ठला भक्त तुझा भोळा

1 min
582


विठ्ठला भक्त तुझा भोळा

विठ्ठल नामाच्या गजराने
अवघी दुमदुमली पंढरी
चंद्रभागेच्या पाण्यात
मन शुद्ध करे वारकरी

हात जोडुनिया तो
उभा राही विठ्ठला समोर
सांगे विठ्ठलाला
झालो मी दुष्काळाने लाचार

किती पाहशील रे विठ्ठला
तू माझ्या संसाराचे हाल
माझ्या लेकरा बाळांचे
खाण्यासाठी होतात रे हाल

मला नको रे फुकटाचे
मेहनत करायला मी खंबीर आहे
फक्त पाठ नको फिरवू माझ्याकडे
कारण दुष्काळाने मी बेहाल आहे

विठ्ठला तुझ्या कडे रे मी
हात जोडुनिया विनंती करत आहे
या आभासी जगात मात्र
तुझीच मला साथ हवी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन