विश्वास
विश्वास
ठेव विश्वास विश्वास
नको कोरडाच भाव
उगा दावितो कशाला
माणुसकीचा अभाव....!!
ठेव विश्वास विश्वास
माणसाला रे ओळखा
कुठे लपे माणुसकी
फसव्यांचा रे विळखा.....!!
ठेव विश्वास विश्वास
देव माणसात शोध
किती करी मरमर
तुही घे ना काही बोध.....!!
ठेव विश्वास विश्वास
आम्हा पेन्शन मिळेना
कुठे गेली हो समता
नाही ममता मिळेना.....!!
असं कसं म्हणता हो?
दादा तुम्ही नो पेन्शन
कसा ठेवावा विश्वास?
काल, आज, उद्यापण.....!!
किती पेन्शन धारक?
गेली निघून पटापटा
नका अघोरी निर्णय
हात हाले लटलटा......!!
कसा ठेवावा विश्वास?
दादा तुमच्या हो वर
देशाच्याही हितासाठी
भरतोय आम्ही कर......!!
कधीतरी गाडीतून
थोडं खालीही उतरा
आंदोलने, मोर्चे काढून
येतायेत हो चकरा......!!
आतातरी सोडा नाद
किती ठेवावा विश्वास
आपलेच आपलीच
कापतात असा भास....!!
चला आता एक होवू
म्हातारपणाची काठी
आमच्याच हक्काचे
राहा फक्त सदा पाठी.....!!
