STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

विश्र्वास

विश्र्वास

1 min
245

ठेव विश्वास विश्वास

नको कोरडाच भाव

उगा दावितो कशाला

माणुसकीचा अभाव....!!


ठेव विश्वास विश्वास

माणसाला रे ओळखा

कुठे लपे माणुसकी

फसव्यांचा रे विळखा.....!!


ठेव विश्वास विश्वास

देव माणसात शोध

किती करी मरमर

तुही घेना कांहीं बोध.....!!


ठेव विश्वास विश्वास

आम्हां पेन्शन मिळेना

कुठे गेली हो समता

नाही ममता मिळेना.....!!


असं कसं म्हणता हो

दादा तुम्ही नो पेन्शन

कवा ठेवावा विश्वास

काल,आज उद्यापण.....!!


किती पेन्शन धारक

गेली निघून पटापटा

नका अघोरी निर्णय

हात हाले लटलटा......!!


कसा ठेवावा विश्वास

दादा तुमच्या हो वर

देशाच्याही हितासाठी

भरतोय आम्ही कर......!!


कधीतरी गाडीतून

थोडं खाली ही उतरा

आंदोलने,मोर्चे काढून

येतायेत हो चकरा......!!


आतातरी सोडा नाद

किती ठेवावा विश्वास

आपलेच आपलीच 

कापतात असा भास....!!


चला आता एक होवू

म्हातारपणाची काठी

आमच्याच हक्काचे 

रहा फक्त सदा पाठी.....!!


Rate this content
Log in