वैचारिक गुलामगिरी
वैचारिक गुलामगिरी
गुलामांना गुलामगिरीची
जाणीव नाही उरली,
शिकलेल्यांनीही गुलामगिरीची
वाट की हो धरली
पैशाच्या मोहापायी इथे
कोणी झाले गुलाम,
तर दुश्मनाचा दुश्मन म्हणून
कोणी कोणाचे गुलाम
चांगल्या वाईटातला फरक अजून
शिक्षणाने नाही उमजला,
स्वाभिमानाचा अर्थ अजूनही
कित्येकांना नाही समजला
काही महाभाग तर असे म्हणतात की,
लोकशाहीपेक्षा हुकुमशाही बरी,
त्यांना हुकुमशाहीची झळ सोसल्याशिवाय
कशी कळणार लोकशाहीची किंमत खरी ?
आयते स्वातंत्र्य मिळालेल्या पिढीने
स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यावे,
स्वाभिमान अंगी भिनवावा अन्
वैचारिक गुलामगिरीला सोडून द्यावे.
