STORYMIRROR

Amol Shinde

Others

3  

Amol Shinde

Others

वाटलं नव्हतं

वाटलं नव्हतं

1 min
12.1K

किती दिवसानंतर आलीस

काळजाची राणी झालीस

अगं एकदाच बोलून टाक 

वेड्याच्या प्रेमात कशी न्हालीस


बोल लवकर बोल सखे 

मुग्गीळून उभा राहू नकोस

श्वास थांबले धडधड थांबली

एकटक वेड्यासारखं पाहू नकोस


अस स्वप्नांत मी पाहिलं होतं

सारे सारे तुझेच भास होते

जीवनाला वेगळं वळण देणारे

ते सारे माझ्यासाठी खास होतें


कथेला कुठे नव्याने सुरवात झाली

एका वावटळीनं सारं उध्वस्त केलं

तिच्या मनात माझ्या बद्दलं शून्य झालं

जे होतं ते सारं विश्वासघातांन नेलं


कथेतल्या माझ्या राणीच गाव 

काळ्या अंधारात खाक झालं व्हतं

किती दिवसांनी आठवण आली

असं भेटणार आपण वाटलं नव्हत


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન