वाट
वाट
1 min
420
पाऊल एक एक तुझकडे
एकामागे एक चालताना
वाटायचे मनात कधीकधी
आठवणीत तिला पाहताना..
दूर जरी असली तरी तू
कधी असे वाटले नाही
पाऊल तुझकडे वळताना
कधीच ते थकले नाही....
दिवसामागून दिवस गेले
ते ही कधी कळले नाही
आयुष्यात चालताना मग
पाऊल ते थांबले नाही...
मनातलं नात तू कस बग
अजून तू तसच जपलं
म्हणून तर माझ्या मनानी
काळजात तुला घेतलं....
असच प्रेमाचं नात अखंड
जगाच्या माथ्यावर करूया
चालताना वाटेवर असच तू
मनाचा कधी वेध घेऊया ....
पावलं थकली चालून चालून
मन हे कधीच ग थकलं नाही
तुझ्या आठवणींनी आताही ग
भेटीचा क्षण मी विसरत नाही...
