असं असावं प्रेम
असं असावं प्रेम
1 min
428
नाही भेटलो मी तर दिवसभर
तिनं बेचैन खूप व्हावं
संध्याकाळी ऑफिसाबाहेर
भेटून तिनं सरप्राईज द्यावं
भेटीसाठी त्या ठिकाणी
माझ्या आधी तिनं यावं
जर उशीरा मी आलो तर
तिनं खडसावून रागावावं
फिरताना नजरेआड झालो तर
तिनं कावराबावरा व्हावं
दिसल्यानंतर तिनं मात्र
प्रेमाचे अश्रू खूप गाळावं
कधी मी चुकलोच कधी
तिनं मला नाही रागवावं
अबोल राहून मनात ठेवून
चुकलेलं ते मग सांगावं
कल्पनाच करू शकत नाही
इतकं भरभरून प्रेम द्यावं
तिची आठवण झाली तर
तिच्यासाठी मी कविता लिहावं...
