शब्द आणि पेन
शब्द आणि पेन
1 min
393
जीवनामध्ये तारणारा
शब्द आणि पेन
आयुष्याचा सोबती होता...
जीवनातील अपमान सोसणार
शब्द आणि पेन
करुणेचा आधार होता....
जीवनाला स्वाभिमान देणारा
शब्द आणि पेन
जगण्याचा नवा मार्ग होता.....
जीवनात संकटाशी साथ देणारा
शब्द आणि पेन
ढाल आणि तलवार होता...
जीवन जोत फुलवणारा
शब्द आणि पेन
काळजाचा देठ होता....
अपमान दुःख पचवणारा
शब्द आणि पेन
जीवन चालवणारा वाहक होता..
जीवन माझे चालवणारा
शब्द आणि पेन
सुख दुःखाचा आधार होता
