सय
सय
1 min
199
रोज कामावून येता सय
तुझी येति आठवण
कुठे शोधू आता तुला
काळजात दुखत ग मन
चिल्या पिल्याच्या ओडिन
तू ग लय झिरपली
नियतीनं घाला का केला
माझी सय हरपली
सुख दुखाचे दिवस तू
उभ्या आयुष्यात झिजवले
ऊन वारा पावसा मंदी
बाळ पदराखाली निजवले
ऊन सावली तू लेकराची
आता दिसणार ग मला
आधार आयुष्याचा इथे
प्रकाश अंधारात लोपला
नात जाळत ग मनाला
रक्ताच्या थेंबानी मांडतो
शब्द शब्द तुझ्यासाठी
डोळ्यातील अश्रूंनी सांडतो
