वाट बघते
वाट बघते
1 min
200
जीव झाला कासावीस
किती पहावी रे वाट
तुझ्या आठवणीतील
मांडला फुलांचा घाट
वाट पहाता थकले डोळे
झाले विचलित मन
कधी सरल हे दिस
येतील मिलनाचे क्षण
तुझ्या आठवणीत सख्या
तुझ्या भेटीचे गुणगान
कशी उडती पाखरे
बहरल सार रान
आठवता तुझी भेट
अंग मोहरुन जाते
किती करु येरझारा
मन व्याकुळ रे होते
तुझ्या भेटीसाठी सख्या
क्षण सुगंधित झाले
पारिजातकाचा पडला सडा
रंग उधळीत आले
