STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Others

4  

Govardhan Bisen 'Gokul'

Others

वारी चालली पंढरी

वारी चालली पंढरी

1 min
213

वारी चालली पंढरी

अनवाणी वारकरी |

माऊलीच्या भेटीसाठी

भक्तीभावे कास धरी ||१||


वारी चालली पंढरी

करी विठूचा गजर |

वाटेतील दिंडीवर

राही विठूची नजर ||२||


वारी चालली पंढरी

हाती घेवुनिया टाळ |

झांज मृदंग वाजती

गळा तुळशीची माळ ||३||


वारी चालली पंढरी

नाचुनिया तालावर |

घेवुनिया आनंदाने

तुळशीला डोईवर ||४||


वारी चालली पंढरी

अश्व नाचे रिंगणात |

नेत्र पारणे फिटती

भरे आनंद उरात ||५||


वारी चालली पंढरी

होई भेटीचा उमंग |

वाहे भक्तीचा तरंग

होती वारकरी दंग ||६||


वारी चालली पंढरी

मुख विठूचे पहाया |

भिमातटी राही संगे

उभा माझा विठुराया ||७||


वारी चालली पंढरी

संगे चाले गोवर्धन |

पंढरीत आनंदाने

होई विठूचे दर्शन ||८||


Rate this content
Log in