उरल्या न कोणत्या भावना
उरल्या न कोणत्या भावना
उरल्या ना कोणत्याच भावना
का केलास असा वार
जागवलीस पालवी मनी अन्
नकाराचा केलास प्रहार
का दाखवलीस दिवास्वप्नं
का लावलास तुझा लळा
उरले ना काही माझ्यापाशी
ना सोसवेना या कळा
धीर देत स्वतःला सावरतो
तरीही वाट सापडेना
वरवर दाखवले किती तरी
मनाला शांत बसवेना
शोधतो रोज वाटा नव्या
आठवणींना दूर ठेवण्या
कोंदणात नाही राहात त्या
थोड्या वेळच्या पाहुण्या