उगाच का रडत बसावे?
उगाच का रडत बसावे?
1 min
161
उगाच का रडत बसावे?
माणसाने खंबीर असावे
संकटाशी दोन हात करत
आनंदाने सदा हसावे....!!
कोणावर कधी का रूसावे
माणसात सदा देव दिसावे
प्रयत्नावर विश्वास ठेवावा
चालू दुनियेत कुणी ना फसावे..!!
सर्वांगसुंदर मनचित्त असावे
तिथे कोणते जातिभेद नसावे
दिसण्यापेक्षा सदा माणसाने
मनाने सदैव मोठे असावे...!!
