तुळसी मंगलाष्टक
तुळसी मंगलाष्टक
1 min
261
कार्तिक एकदशीला
तुळशी नटली
वर बाळकृष्णाला बघुनी
गालातल्या गालात हसली..
शुभ मंगल सावधान
दिवा रांगोळी टाकूनी
तुलसी बाळकृष्ण सज्ज झाले
दोन्हीकडील मामा हातात
अंतरपाट धरुनी तयार झाले..
शुभ मंगल सावधान
ऊस दादा झेंडू ताई
एकमेकावर डुलू लागले
वाजन्त्रीवाले साव चित्त
शुभ मंगल सावधान झाले..
शुभ मंगल सावधान.
वऱ्हाडी नि ताट वाजवले
पोरान्नि लाडू खाल्ले
तुलसी बाळकृष्ण वधू वर
विवाह बंधनात अडकले.
शुभ मंगल सावधान
तुलसी बाई तुला नाहीत माय बाप
रोज करूनि तुझी सेवा
तू करते आमच्या पापांचा नायनाट....
शुभ मंगल सावधान...
