STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

तुझं माझं मायेचं नातं...

तुझं माझं मायेचं नातं...

1 min
535

तुझं माझं मायेचं नातं

का गेलीस आई तू सोडून?

तू गेल्यापासून माझी

पार गेलीय कंबर मोडून...!!


तुझ्या मायेची सावली आई

अजूनही होती हवी

तुझ्यासाठीच मी गं 

खरेदी केली साडी नवी....!!


त्या साडीला आजही आई

ठेवले गं काळजाच्या कुपीत

असं कसं नशीब देवा माझं

का माझं जीवनच शापित.....!!


पोरकी झाले आज मी गं

तुझ्या मायेच्या ममतेला

आईविना अर्थ आहे का जगी

का नेलंस देवा तू माझ्या मातेला...!!


तुझ्याविना आई मजला

एक क्षणही करमत नाही

आईच्या मातृत्वाला भुकेली मी

शोधण्या तुजला नजर फिरे दिशादाही...!!


तुझ्यासारखी दिसली बाई

मन माझं आतूर होई

किती उपकार तुझे आई

सांग कसं होऊ उतराई....!!


Rate this content
Log in