तुझं असणं
तुझं असणं
1 min
477
तुझं असणं मनाला खूप खूप भावत
जणू हरवलेल सारं तुझ्या कुशीतच घावत
तुझं असणं फूलपाखराप्रमाणे भिरभिरत
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात हळूच ते शिरतं
तुझं असणं उंच झुल्यावर लाबंच लांब झुलत
समोर असताना ही मनात मात्र सदैव डूलतं
तुझं असणं बंद मनाची कवाडे माझ्या खोलत
अडचणीत नेहमीच ते आपूलकीने बोलत
तुझं असणं म्हणजे घर भरल्यासारख वाटत
तुझ्या काळजीने कधी काळीज माझं दाटत
तुझं असणं म्हणजे सदैव फुललेली परसबाग
दिवस रात्र तुझ्या हसण्याने येते तिला जाग
तुझं नसणं याचा मनाला विचार करवत नाही
तू सदैव सोबत रहा याखेरीज काही मागणं नाही
