ती
ती
ती रोज आपल्यासाठी जगते
मग एकदातरी आपणही तिच्यासाठी जगायचं
ती नाही म्हटली तरी
एकदातरी तिच्यासारख
होवून बघायचं
खुप वेदना असतात तिच्या मनात
पण ती सागंत नाही
अश्रुतून ही ती येवू देत नाही
आयुष्य म्हणजे तिच्यासाठी
तारेवरची कसरत अहते
दुसऱ्याच्या सुखासाठी
ती स्वतःला विसरत असते
ती नवदुर्गा असली तरी
मन तिचे हळवे असते
संघर्षाच्या वाटेवर फक्त
ती ऐकटीच असते
सतत काम परिश्रम
करूनही ती
कधी थकवा दाखवत नाही
झाला जरी कितीही त्रास
तरी चेहऱ्यावरच हसु जावू देत नाही
मोकळीक जरी असली तिला
तरी बंधनाची बेडी
तिच्या पायातच असते
घर संसार कुटुंब परिवाराच्या चौकटीतून
बाहेर पडायला तिला फुरसत नसते
खरतर माणूस तिच्यामुळे पळत असतो
तिच्या भोवती घोळत असतो
तिच्याशिवाय पुर्ण काहीच होत नाही
ती नसल्यावर मग जगण्यालाही अर्थ
ऱ्हात नाही
खुप कष्ट करतो माणूस
पण तिच्यासारख जगता
येत नाही
आधार जरी तिचा असला
तरी तिच्याशिवाय
घर मंदिर होत नाही
