ती निघून गेली
ती निघून गेली
1 min
235
दारात उभी राहून लेकीची वाट पाहणाऱ्या आईला सोडून
ती निघून गेली
बापाच्या डोळ्यांना
अश्रू देऊन गेली
स्वप्ने सुखी संसाराची
ती सोबत घेऊन गेली
राखी बांधायचा हात सोडून ती निघून गेली
तिचे सुंदर दिसणे
का डोळ्यांना खुपले
काय तिचा गुन्हा
तिला न कळले
दिला तिने नकार
त्याने जीव घेतला
तळमळणारा तिचा श्वास
शेवटी शांत झाला
किती भोगल्या यातना
किती सोसल्या वेदना
किती झुंजली ती जगण्यासाठी
पण तिचा जन्म होता
फक्त मरण्यासाठी
तिचा जन्म होता
फक्त मरण्यासाठी
