तिचा वनवास
तिचा वनवास
कान फूंकले मंथराने
आणि राम तू वनवासात गेला
सीतेमुळे रामायण घडले
असा इतिहास लिहला गेला
घात केला त्या रावणाने
आणि सीतामाता पळवली
अत्याचाराची ती पहिली बळी
अशी इतिहासात नोंद झाली
आला वनवास संपवून अयोध्येत राम तू
तिथेही माणसांच्या नजरेत रावण होता
शंका संशयाचा सीतेवर बाण होता
उगाच दोष देवून
छळ तिचा होत राहीला
सत्वपरिक्षेसाठी राम तूने
सीतेचा त्याग केला
रामराज्य कधीच गेले
आता स्वयम राज्य आहे
बंधनाच्या गुलामीतुन
मुक्त होण्यासाठी
ती स्वातंत्र्य शोधते आहे
पण तुझ्या नावाने मते
मागणाऱ्याची ईथे कमी नाही
या कौरवांच्या गर्दीत
श्रीकृष्ण कुठे दिसत नाही
म्हणून
आजही या कलीयुगात
तिचा वनवास संपलेला नाही
ती वनवासच भोगते आहे
अन्याच्या विरोधात ती
एकटीच लढते आहे
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
तिच्या पावलागणिक काटेच असतात
पण ती घाबरत नाही
न्याय तिला तेव्हाही नव्हता आजही नाही
तरीही या विद्वान बुध्दीमान
माणसाच्या जगात ती मागेन नाही
हातात कलम घेवून ती
घाव तलवारीचा देते
आपल्या कर्तबगारीचा
ती रोज नवा इतिहास लिहते
