STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

स्वप्नातील जग

स्वप्नातील जग

1 min
120

सहज बसले विचारात 

विचारात लागली तंद्री

पाहिले *स्वप्न उद्याचे*

झाली मनात गर्दी 


 जग पाहिले स्वप्नात

 मनोहर रमणीय

जन घेतात काळजी

राखण्यास लोभनीय


विश्व शांतीचा एकची

सर्व जगी नांदे भाव 

जन गुण्या गोविंदाने

 नसे कुणा दुःख ठाव


नाही कोणीच उपाशी

सर्व जनांना निवारा

समजून राही जन

कुलुपाचा न पहारा


जन जपतात नाती

विश्व बंधु भाव मनी

संस्कृती ची परंपरा

दिसे सदा क्षणोक्षणी


 रोज येती सांजवेळी

ऐकायला पसायदान

देई संदेश जगाला

विश्व शांती योग्य दान


साहित्याला गुण द्या
लॉग इन