स्वप्नात भेट झाली
स्वप्नात भेट झाली


स्वप्नात भेट झाली सत्यात राहिली,
कोडी युगायुगांची कोड्यात राहिली.
पानास जीर्ण जाळी जाळीत आठवे
ती कोवळीक आता देठात राहिली.
का वादळापरी तो गेला निघोनिया
माघातही उन्हाची देहात काहिली
मी श्रावणास माझ्या अश्रूंत बांधले,
विद्युल्लता तरीही कोषात राहिली
जन्मात मागच्या मी मागीतला हरी,
माझी कथा अजूनी फेऱ्यात राहिली.