सुर्य नमस्कारदिन
सुर्य नमस्कारदिन
सुर्य नमस्कार दिन
चला साजरा करू
झटकून आळसाला
व्यायामाची कास धरू....!!
सुर्यनमस्काराचे फायदे
लक्षात ठेवा सर्वांनी
निरोगी सुडोल शरीर
मिळेल बघा व्यायामांनी....!!
रोगप्रतिकार शक्ती वाढते
नित्य त्या व्यायामाने
निरोगी शरीरात वास
राही निर्मळ त्या मनाने....!!
वजनावर नियंत्रण राही
नित्य सुर्य नमस्काराने
नाही दुखणार पाय
कधी वाढलेल्या भाराने......!!
नको आजाराला आमंत्रण
नको कसल्या गोळ्या खाणे
लवकर उठावे पहाटसमयी
नको दिवसभर आळसवाणे....!!
चिरतरुण रहायचे असेल तर
करा नित्य सुर्य नमस्कार
चेह-यावर झळकेल तेज
शरीराला येईल आकार......!!
