सुख सरी मोतीयाच्या...
सुख सरी मोतीयाच्या...
1 min
362
सुखसरी मोतियांच्या
चला झेलीत गं जाऊ
माणुसकी भाव जपू
कष्टाचीच लेस लावू.....!!
जावू सत्याच्या मार्गाने
गीत एकतेचे गाऊ
कोणी सापडे संकटी
हात मदतीचा देवू.......!!
करू साहित्याची सेवा
एकमेका साह्य करू
प्रामाणिक राहूनिया
सन्मार्गाचा पथ धरू.....!!
अवघड वाट जरी
हात हातात रे घेवू
सत्कार्याचा वेलू मग
उंच गगणाला नेवू........!!
अर्धी भाकर पोटाला
तयासाठी कष्ट करू
सामनाही संकटाचा
मोठ्या धैर्यानेच करू.....!!
