स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
1 min
180
स्त्री एक प्रेरणा, समाजाला दिशा देणारी
घरादारासोबतच , मुलांचा ही सांभाळ करणारी...
स्वतः शिकून , इतरांनाही शिकवणारी
घरासाठी दिवसभर मरमर करणारी....
प्रत्येकाच्या भाव भावना जपणारी
संकटाला न घाबरता चार हात करणारी....
नर जन्माची उगमस्थान असणारी
पुऋषत्वाला न डाग लावणारी.....
स्त्री एक प्रेरणा आपल्या जीवावर ठाम राहणारी
वेळप्रसंगी घरी दारी चार हात करणारी....
स्त्री एक प्रेरणा, नव्युगाचे वेगवेगळे आव्हान पेलणारी
स्त्री एक चळवळ आहे,जी शेवट पर्यंत सुरू राहणारी....
