STORYMIRROR

Arti Zoting

Romance Others

3  

Arti Zoting

Romance Others

सरता आषाढ

सरता आषाढ

1 min
27

निळे काळेभोर मेघचक्षु रोखून धरले देही

सर्वांग थरथरले अन् संपली लाही लाही


निसंग असा देतो अवचित मनी पाऊल

लबाड चित्तचोर देतो हूल देऊन चाहूल


अवखळ उन्माद अन् उसळती मदन मस्ती

चिंब भिजून काया केसातून ओघळती मोती


आतूरल्या अंगणी झरता गार दुग्ध धारा

रानोमाळ फुलतृणातून उसळला मृदगंध सारा


देह तुझ्या हवाली तिने निसंकोच केला

सजल निरोप दिलास पांघरून ओलेता शेला


हिंदोळ्यावर आनंदाच्या झुलेलं इंद्रधनुचा श्रावण झुला

हर्ष किती सांगू सरता आषाढ भिजवून गेला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance