घननीळ
घननीळ
1 min
76
घननीळ खेळतो अंबरी
फुलवित मोर पिसारा
पदन्यास चपळ विजांचा
घोंघावतो बेधुंद वारा
दाटून काळोख चहूबाजूंनी
नभी एकटा ध्रुव तारा
घननीळ खेळतो अंबरी
साक्षीला आसमंत सारा
शिरवा थेंबांचा तप्तांगी
सुगंधात न्हाली धरा
घननीळ खेळतो अंबरी
झेलीत सर्वांगी जलधारा
गंधाळल्या रातराणी काननी
कौमुदिनी फुलल्या सरोवरा
घननीळ खेळतो अंबरी
झरला उन्माद चराचरा
