STORYMIRROR

Arti Zoting

Others

4.3  

Arti Zoting

Others

पाऊस आणि पुरुष

पाऊस आणि पुरुष

1 min
51


पाऊस आणि पुरुष दोघांचही सारखचं

कितिही लावा जीव वागणं ह्यांच तिरकस


नको तेव्हा उगाच धो धो धो धो बरसतात

गरजेच्या वेळी मात्र भाव खात अडसतात


ऋतू काळ वेळ ह्यांच ठेवायच नाही भान 

जरा कधी हटकलं की लगेच दुखावतो मान


दाखवून जातात सदा आपली पुरूषी वृत्ती 

रोमरोमात संचारते त्यांच्या तारूण्याची मस्ती 


आली मनी लहर की केलाच समजा कहर

मग मातीमोल का होवोना तिच्या यौवनाचा बहर 


कधी कधी करावा तिच्या ही मनाचा विचार 

स्त्रीत्वाचा राखावा मान होऊन शहाण समजदार 


येवढच आहे म्हणनं काळवेळ पाहुन बरसावं 

भावना जपत एकमेकांच्या तृप्तीसुखात न्हावं... 


Rate this content
Log in