STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

स्पर्श

स्पर्श

1 min
226

एक स्पर्श आईचा

गोड उबदारपणाचा

कुशीत विसावल्या

त्या अमृतधारेचा....!!


एक स्पर्श नात्यांचा

अलगद उचलल्या मिठीचा

गोड गोड पापे घेत

केल्या गोड कौतुकाचा....!!


एक स्पर्श आधाराचा

बोटास धरल्या पित्याचा

आयुष्याचा आधारवड

सरसावल्या त्या पावलाचा...!!


एक स्पर्श गुरुजीचा

कौतुकाच्या थापेचा

पाठीवरती हात ठेवून

दिल्या त्या शाबासकीचा...!!


एक स्पर्श मित्रत्वाचा

हातात दिल्या हाताचा

दोस्ताबिगर दुनिया नाय

अशा गोड गोड बातांचा....!!


एक स्पर्श प्रियकराचा

खुणावल्या त्या नेत्रांचा

अधिरले ते वेडे मन

रात्रीत येणा-या स्वप्नांचा....!!


एक स्पर्श जिवलगाचा

शरीर दोन पण एक मनाचा

एक स्पर्श त्या गर्भाचा

उमलणा-या नाजूक मनाचा...!!


Rate this content
Log in