सोनसकाळ
सोनसकाळ
1 min
263
गरीबीचे चटके सोसत
जगण्याचीही लक्तरे झाली
तरी आयुष्याची चादर कधी
होऊ दिली नाही ओली
दोष दिला नाही नशीबाला
मनगटावर ठेवला विश्वास सारा
प्रत्त्येक संध्याकाळी येतेच
नव्या दिवसांचा नवा पसारा
कर्तृत्वाचे पंख भरारी घेती
जगण्याचे उत्तर देण्या सरसावती
कष्ट केल्याशिवाय फळ न मिळती
प्रत्त्येक संध्याकाळ मज हेच सांगती
प्रत्त्येक पाऊले ध्यासपंथी चालली
मंगलकारी क्षणाची संध्याकाळ ही
सरेल सारी दु:खाची गर्द छाया तरी
येईल पुन्हा आनंदाची सोनसकाळही
